रत्नागिरी आनंद सोहळा - रविवार, 24 डिसेंबर 2023
"इथे प्रेम कृपा आहे मायेचा सोहळा, इथे नयनी भाव आहे भक्तिचा सोहळा". सद्गुरू अनिरुद्ध बापूंचे त्यांच्या श्रद्धावान मित्रांवरील प्रेम व कृपा अनुभवणं म्हणजे जणु एक मायेचा सोहळाच! बापूंवर मनापासून प्रेम करणारा प्रत्येक श्रद्धावान हा मायेचा सोहळा, हा भक्तिचा सोहळा पदोपदी अनुभवत राहतो. बापूंवर रचलेल्या पिपासा आदि भक्तिरचना ह्याचीच साक्ष देतात. गेल्या काही वर्षांमध्ये ह्या भक्तिरचनांवर आधारित "नाहू तुझिया प्रेमे", "अनिरुद्ध प्रेमसागरा (नाशिक)", "अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य" असे लाइव्ह सत्संगाचे कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित करण्यात आले होते ज्याच्या अविस्मरणीय सुखद आठवणी आजही श्रद्धावानांच्या मनात ताज्या आहेत.
ह्याच अनुषंगाने एक पुढचे पाऊल म्हणून, पुन्हा एकदा ह्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी, कोकणच्या लाल मातीला भक्तिभाव चैतन्याच्या वर्षावात भिजवून टाकण्यासाठी रविवार, दि. २४ डिसेंबर २०२३ रोजी "प्रमोद महाजन क्रीडा संकूल, गांधी कॉलनी, टिळक आळी, रत्नागिरी, महाराष्ट्र ४१५६१२" येथे बापूंवरील भक्तिरचना व अनुभव संकीर्तनाच्या लाइव्ह सत्संगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ह्या सत्संगाची वेळ साधारणपणे संध्याकाळी ४.३० ते रात्री ९.३० पर्यंत असेल ह्याची सर्व श्रद्धावानांनी नोंद घ्यावी.
अशा प्रकारचा आनंद सोहळा पहिल्यांदाच कोकणच्या ह्या पवित्र भूमीत आयोजित केला जात असून, हे सुवर्ण क्षण अनुभवण्याची अमूल्य संधी आपणा सर्व श्रद्धावान बांधवांसाठी सद्गुरुकृपेने चालून आली आहे. ह्या सत्संगाच्या प्रवेशपत्रिकांचे देणगीमूल्य व ते स्वीकारण्याच्या प्रक्रियेबद्दलची माहिती पुढील सूचनेमध्ये लवकरच देण्यात येईल.
----------------------------
"इथे प्रेम कृपा आहे मायेचा सोहळा, इथे नयनी भाव आहे भक्तिचा सोहळा". (‘यहाँ प्रेम कृपा है ममता का उत्सव, नयनों में भाव यहाँ पर भक्ति का उत्सव’) सद्गुरू अनिरुद्ध बापू के श्रद्धावान मित्रों के प्रति रहनेवाले उनके प्रेम और कृपा को अनुभव करना, यह मानो एक ममता का उत्सव ही है! बापू पर मन:पूर्वक प्रेम करनेवाला हर एक श्रद्धावान इस ममता के उत्सव का, इस भक्ति के उत्सव का अनुभव हर पल करते रहता है। बापू पर रची हुईं ‘पिपासा’ आदि भक्तिरचनाएँ इसी बात का प्रमाण हैं। पिछले कुछ सालों में इन भक्तिरचनाओं पर आधारित "नाहू तुझिया प्रेमे", "अनिरुद्ध प्रेमसागरा (नाशिक)", "अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य" ऐसे लाइव सत्संग के कार्यक्रम विभिन्न स्थानों पर आयोजित किये गये थे, जिनकी अविस्मरणीय सुखद यादें आज भी श्रद्धावानों के मन में ताज़ा हैं।
इसी अनुषंग से एक अगले कदम के रूप में, फिर एक बार इन स्मृतियों को ताज़ा करने के लिए, कोंकण की लाल मिट्टी को भक्तिभाव चैतन्य के वर्षाव में भीगो देने के लिए रविवार, दि. २४ दिसम्बर २०२३ को "प्रमोद महाजन क्रीडा संकुल, गांधी कॉलनी, टिळक आळी, रत्नागिरी, महाराष्ट्र ४१५६१२" इस स्थान पर, बापू पर रची हुईं भक्तिरचनाएँ तथा अनुभव संकीर्तन इनका लाइव सत्संग कार्यक्रम आयोजित किया गया है। इस सत्संग का समय लगभग शाम ४.३० से रात ९.३० तक होगा, इसपर सभी श्रद्धावान ग़ौर करें।
इस प्रकार का आनंद उत्सव पहली ही बार कोंकण की इस पवित्र भूमि में आयोजित किया जा रहा है और इन सुवर्ण क्षणों को अनुभव करने का अमूल्य अवसर हम सभी श्रद्धावान बांधवों के पास सद्गुरुकृपा से चलकर आया है। इस सत्संग की प्रवेशपत्रिकाओं का डोनेशनमूल्य तथा उसका स्वीकार करने की प्रक्रिया के सन्दर्भ में जानकारी अगली सूचना में जल्द ही दी जायेगी।