‘ रामनामतनु ’चा अर्थ (The Meaning of `Ramnamtanu')
परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या १५ मे २०१४च्या मराठी प्रवचनात ‘ रामनामतनु ’च्या अर्थाबाबत सांगितले.
त्रिविक्रमाचं काम सांगणारा हा मंत्र आहे, तो कसा आहे? तो रामनामतनु आहे. तो कसा आहे? राम नाम आणि तनु. बघा, तनु म्हणजे काय? तनु म्हणजे शरीर. नाम म्हणजे काय? नाम म्हणजे नाम ना साधं, पण नाम काय आहे? इकडे आपण बघितलं तनु, प्राण आणि काल ह्या दोन गोष्टी आहेत, मग इकडे नाम म्हणजे काय? म्हणजे जो जीवनकाळ तुम्हाला मिळालेला आहे, ह्या जीवनकाळचं symbol काय आहे दुसरं? नामच आहे ना? पटलं?
श्रीरामचंद्र दशरथ काकुत्स्थ। हे नाव संपूर्ण रामाचं. हे संपूर्ण चरित्र कशामध्ये आलं? त्याच्यामध्ये आलं? पटलं की नाही पटलं? म्हणजे नाम काय आहे, तुमचा जीवनकाळ जो आहे, त्या जीवनकाळाला पूर्णपणे असणारा जो सांकेतिक कोड नंबर आहे, ते तुमचं नाव आहे.
म्हणजे तुमचा जीवनकाळ, तुमचं नाम, आणि राम. राम कोण आहे? सूर्यवंशी आहे. पटतं? आणि तो काय करतो? आपण रामरक्षेमध्ये काय म्हणतो? पहिलीच गोष्ट काय? रामरक्षा मध्ये कवच आहे ना? अमुकचं रक्षण करो, तमुकचं रक्षण करो, शिरो मे राघवः पातु। पातु म्हणजे संरक्षण करो. म्हणजे माझ्या बुद्धीचं संरक्षण कोण करो? राघव राम करो. पटतंय?
राम हा कोण आहे? बुद्धिचं रक्षण करणारा आहे. पटतंय? म्हणजेच काय? की माणसाच्या हातातल्या ज्या तीनही गोष्टी आहेत, त्या तीनही गोष्टींचं कंट्रोल राम म्हणजे तो परमात्मा त्या रुपाने नाम म्हणजे काल रुपाने महाविष्णु रुपाने शिव रुपाने आणि तनु, शरीर निर्माण कोणी केलं? ब्रह्मदेवाने केलं, प्रजापति ब्रह्माने केलं, तीनही रुपाने जो एकत्रितरित्या आमच्या हातामध्ये जे काही आहे त्या सगळ्याचा चांगला विकास करणारा कोण आहे? एकमेव त्रिविक्रम आहे, म्हणून मी त्याला काय म्हणतो? ॐ रामनामतनु. आलं लक्षामध्ये?
‘‘रामनामतनु’च्या अर्थाबाबत’ सद्गुरु श्री अनिरुद्धांनी प्रवचनात सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥