आता वेध पुनर्मिलापाचे (Lord Ganesh's Punarmilap Procession)
आता वेध पुनर्मिलापाचे (Lord Ganesh's Punarmilap Procession)
बापूंच्या घरच्या गणपतीचे गुरुवारी दणक्यात आगमन झाले. ह्या सोहळ्यादरम्यान पुनर्मिलापाची मिरवणूक किती भव्य आणि दिव्य असेल याची झलक मिळाली. यावर्षी पुन्हा पण अधिक चांगल्या प्रकारे हा गणेशोत्सव अनुभवणे अगदी जगाच्या कानाकोपर्यातील श्रद्धावानाला www.aniruddha.tv च्या माध्यमातून शक्य झाले. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी गणपती बाप्पाचे आगमन, पहिल्या दिवशी पुजन व रात्री महाआरतीचे थेट प्रक्षेपण जगभरातील श्रद्धावानांना Aniruddha TV च्या माध्यमातून पाहीले सर्व श्रद्धावनांनी बापूंच्या सोबत आरतीचा आनंद घेत आहेत हे अनुभवले.
आता उद्या ह्या बापूंच्या घरचा गणेशोत्सव शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा निरोप घ्यायची वेळ येणार आहे. दुपारी उत्तर पूजा संपन्न झाल्यानंतर गणपतीच्या पुनर्मिलाप मिरवणूकीचे वेध लागतील. आपल्या लाडक्या गणरायाला वाजत गाजत निरोप देण्यासाठी श्रद्धावान जमा होतील. बापूंच्या घरच्या गणपतीच्या पुनर्मिलाप मिरवणूकीचा रुबाब आणि थाट काही वेगळाच असतो. पण जे काही होते ते अत्यंत प्रेमाने केले जाते.
सर्व प्रथम दत्तबापा आणि गणपतीच्या मूर्तीचे हॅपी होमच्या खाली कॉरिडॉरमधले आगमन, नंतर नंदाई व घरातील इतर स्त्रियांकडून गणपतीचे औक्षण केले जाते. नंतर आरती होते व बापू, नंदाई सूचितदादा गणरायाचे दर्शन घेतात. गणपतीच्या मिरवणूकीत सामील घेणार्या भव्य शिवलिंगास समीरदादा बापूंच्या सांगण्यानुसार फुले व हार अर्पण करतात. यानंतर बापूंना वंदन करून मिरवणूकीस सुरवात होते. सारे काही Aniruddha TV वर लाईव्ह दाखविले जाईल. त्याचबरोबर ध्वज पथक, लेझिम व ढोल पथक, नृत्य पथक, भक्तांचा एकेक ग्रुप्स्, मध्येच काही दिंड्या, गरुडटके घेऊन नाचणारे श्रध्दावान हे ह्या मिरवणूकीस अधीकच सुशोभीत करतात. पण मिरवणूकीचा प्रमुख केंद्रबिंदू म्हणजे विविध गजरांवर श्रद्धावानांना हात करणारे बापू. पाऊस जरी पडला तरी या पावसात बापू त्यांच्या श्रद्धावान मित्रांसारखेच भिजत सहभागी होतात हे आपण सर्वांनी मागील २ वर्षे अनुभवले आहे.
यावर्षी देखील ही पुनरमिलाप मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या दिवसाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत. या मिरवणूकीत बापूंना समक्ष "याची देही याची डोळा" कधी पाहतोय असेही अनेकांना झाले असेल. ही आस, ही इच्छा पूर्ण होण्यासाठी फक्त एका दिवसाचा अवधी उरला आहे. ज्यांना प्रत्यक्ष इथे येणे शक्य नाही त्यांच्यासाठी मिरवणूकीच्या सुरुवातीचे क्षण Aniruddha TV वरुन थेट प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. तसेच त्या पुढील मिरवणूकीचे फोटो आणि व्हिडीओज् हे Facebook, Google+ व YouTube वरील Profiles व Pages माध्यमातून ’डिफर्ड लाईव्ह’ म्हणजेच अतिशय थोड्या वेळेच्या फरकाने दाखविण्याचा प्रयास आम्ही करणार आहोत.
ll हरि ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll