प्रगटदिनाची भेट ​(Pragatdinachi bhet)

प्रगटदिनाची भेट ​(Pragatdinachi bhet)

श्रीश्र्वासम्‌ (Shreeshwasam) उत्सवाच्या आठवणी अजूनही आपल्या मनात ताज्याच आहेत. अजूनही त्या उत्सवात मोठ्या आईच्या व बापूंच्या कृपेने अनुभवण्यास मिळालेल्या अनेक सुंदर आणि पवित्र गोष्टी मनात घर करून आहेत. हे सर्व परत अनुभवायला मिळावं असे अनेक श्रद्धावानांनी सांगितले. ज्या श्रद्धावानांना काही कारणास्तव ह्या उत्सवाला येता आले नाही, त्यांना तर ह्या गोष्टीची अपार खंतच आहे. अर्थात सद्गुरुंना त्यांची काळजी आहेच. म्हणूनच ह्या श्रीश्र्वासम् उत्सवातील अनेक सुंदर व पवित्र गोष्टींतील एक पवित्र गोष्ट पुन्हा अनुभवण्याची संधी बापूंनी उपलब्ध करून दिली आहे.

मागील गुरुवारी म्हणजेच दिनांक २१ मे च्या गुरुवारी बापूंनी आपल्या सर्व श्रद्धावानासाठी अत्यंत महत्त्वाच्या २ गोष्टी सांगितल्या.

एक म्हणजे श्रीश्र्वासम्‌ उत्सवाच्या काळात मोठ्या आईच्या दरबारासमोर (मणिव्दीप) ज्या दोन "झाली" (कमानी) लावल्या होत्या, त्या आजपासून दर गुरुवारी प्रवचनस्थळी श्रीहरिगुरुग्राम येथे लावण्यात येणार आहेत. प्रवचन झाल्यावर दर्शन घेताना प्रत्येक श्रद्धावानाला श्रीश्र्वासम् उत्सवाप्रमाणेच ह्या झालींखालून जाण्याची संधी मिळणार आहे.

bapuदर्शन घेताना ज्या झालीखालून श्रद्धावान आत येणार त्या झालीवर बापूंनी सांगितलेले द्रव्य ठेवली जातील आणि दर्शन झाल्यावर ज्या झालीखालून श्रद्धावान बाहेर पडतील, त्या झालीवर पान आणि जल शिंपडले जाईल.

ह्या श्रीश्र्वासम्‌ उत्सवामध्ये ह्या सिद्ध झालेल्या झाली आहेत. ह्या झालींवर बापूंनी सांगितलेले पवित्र अल्गोरिदम्स्‌ Algorithms) व त्यातील शुभचिन्हं रेखांकित करण्यात आलेली आहेत. ह्या झालींची सविस्तर माहिती उत्सवाच्या दरम्यानच मी ब्लॉगवर दिली होती. https://sadguruaniruddhabapu.com/zal-during-the-shreeshwasam-utsav आत शिरताना प्रत्येक श्रद्धावानाच्या ‘ऑरा’मधील defects (दोष) minimize (कमी) करण्यासाठीचे कार्य त्या ‘झाली'खाली होईल आणि ज्या चांगल्या गोष्टी श्रद्धावानामध्ये कमी असतील, त्या अधिकाधिक वाढविण्याचे काम बाहेर पडतानाच्या झालीखाली होईल..​"

दुसरे म्हणजे आजपासून दर्शन चालू असताना बापू आपल्या सर्वांसाठी स्वतः जप किवा अन्य उपासना किंवा अभिषेक करणार आहेत. गुरुवारी प्रवचनानंतर नियमितपणे दर्शन घेणाऱ्या श्रद्धावानांना हे माहीतच आहे की दर्शनादरम्यान बापू स्टेजवरूनच श्रद्धावानांशी शक्य तेवढा संवाद साधतच असतात. मात्र पुढे येणाऱ्या कठीण काळात श्रद्धावानांसाठी अधिक उपासनेची गरज आहे, हे जाणून बापू आता गुरुवारच्या दर्शनाच्या वेळेस नेहमीसारखा संवाद न साधता ही तपश्चर्या करणार आहेत.

अशा ह्या दोन्ही शुभ गोष्टींचा शुभारंभ आजच्या गुरुवारपासून होत आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की आज आपल्या लाडक्या बापूंचा 'प्रगटदिन' आहे. बरोबर १९ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे २८ मे १९९६ रोजी सद्य पिपादादा व मीनावहिनी यांच्यासमोर सर्व श्रद्धावानांना बापूंची ओळख पटली. ह्या वर्षी हा दिवस नेमका गुरुवारी आल्यामुळे, ह्या पवित्र दिनी सद्गुरुंचे दर्शन घेण्याची सुवर्णसंधी श्रद्धावानांना प्राप्त झाली आहे.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥