Aniruddha Bhajan Music App - Pipasa-3

Hari Om, I am very much delighted to let you know that many Shraddhavans have already downloaded the 'Aniruddha Bhajan Music App' and have also pre-booked the 'Pipasa-3' album. I am sure more and more Shraddhavans will further avail the opportunity. Here, I would also like to clarify that we will not be publishing this album (Pipasa-3) in the form of a CD and it will be made available only through our official app. The decision has been taken keeping in view that CDs and CD players have become outdated and obsolete, and that their manufacturing is getting phased out very fast. Also, it is difficult to copy-protect the CDs to avoid unauthorized duplication i.e. piracy, which otherwise leads to the circulation of the music tracks on social media which is prohibited under the copyright laws. Let us all meet tomorrow at Shree Harigurugram to witness the live satsang and launch of Pipasa-3 and immerse ourselves in the Trivikram Bhaktibhav Chaitanya - the Aniruddha Premsagar!!!

हरि ॐ,

मला कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की अनेक श्रद्धावानांनी ’अनिरुद्ध भजन म्युजिक’ ॲप डाऊनलोड करून 'पिपासा-३' अल्बमचे प्री-बुकींग करण्यास सुरूवात केली आहे. मला खात्री आहे की अधिकाधिक श्रद्धावान या संधीचा लाभ घेतील.

इथे मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की 'पिपासा-३' हा अल्बम "ऑडिओ सीडी" च्या माध्यमातून प्रकाशीत होणार नाही, कारण सध्या "सीडीज्‌" व "सीडी प्लेअर्स" वेगाने कालबाह्य व लुप्त होत चालले आहेत. तसेच ह्या सीडीज्‌ ची अनधिकृत नक्कल (Duplication) म्हणजेच पायरसी रोखण्यासाठी सीडीज्‌ कॉपी प्रोटेक्ट करणे अत्यंत कठीण आहे व असे न केल्यास सीडीच्या सहय्याने बनवलेले MP3 म्युजिक ट्रॅक्स सोशल मिडीयाच्या माध्यमातून विविध ठिकाणी पसरतात; ज्यामुळे कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन होते. म्हणूनच 'पिपासा-३' व पुढे येणारे सर्व म्युजिक अल्बम्स फक्त आपल्या ’अनिरुद्ध भजन म्युजिक’ या अधिकृत ॲपच्या माध्यमातूनच श्रद्धावानांसाठी उपलब्ध करून दिले जातील.

चला तर मग, भेटूया उद्या, श्रीहरिगुरुग्राम येथे, या सत्संगात सहभागी होण्यासाठी, पिपासा-३ च्या प्रकाशनासाठी व या अनिरुद्ध प्रेमसागराच्या भक्तिभाव चैतन्यात डुंबुन जाण्यासाठी!

। हरि ॐ । श्रीराम । अंबज्ञ । नाथसंविध्‌ ।