ऑनलाईन बँकींगद्वारे देणगी देणे आता सर्वांसाठी खुले(Online donation Aniruddhadham)

काही दिवसांपूर्वीच सद्‌गुरू बापूंनी सर्व श्रध्दावानांच्या हीताकरीता व पवित्र स्पंदनांच्या अभिसरणाकरीत आळंदी येथेल होत असलेल्या पाहिल्या ’अनिरुद्ध धाम’ व त्याच्या रचने संबंधी माहिती दिली. त्याचबरोबर असहाय्य वृध्दांकरीता जुईनगर येथे होत असलेल्या पहिल्या ’इंस्टीट्यूट ऑफ जेरिअ‍ॅट्रीक्स्‌ अ‍ॅन्ड रीसर्च सेंटर’ च्या कामाबद्दल व या दोन प्रकल्पांची व्याप्ती, कार्य व खर्चाबद्दल देखील प्रवचनादर्म्यान माहिती दिली.

रामराज्याच्या प्रवचनात विस्तृत केल्याप्रमाणे कष्टकरी व गरीब शेतकर्‍यांच्या लाभाकरिता कर्जत - कोठींबे नजीक गोविद्यापीठम येथे राबविण्यात येणारा ’अनिरुद्धाज इंस्टिट्युट ऑफ ग्राम विकास’ हा प्रकल्प देखील आता जोमाने कार्यरत झाला आहे.

श्रध्दावानांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता www.aniruddhafoundation.com या साईटवर आम्ही सर्व श्रध्दावानांना देणगी देण्यास सोयीस्कर व्हावे म्हणून आधी असलेल्या क्रेडिट कार्डाच्या पर्यायाबरोबरीनेच आता इंटरनेट बँकींगचा पर्याय देखील उपलब्ध करुन देत आहोत.

ह्या महत्त्वाच्या प्रकल्पांकरिता सर्व इच्छुक श्रद्धावान ’पेमेंट गेटवे’चा वापर करून आपापल्या क्षमतेनुसार संस्थेकडे देणगीमूल्य जमा करू शकतात. ऑनलाइन डोनेशनच्या सुविधेसाठीची प्रक्रिया पुढील प्रमाणे:-

१) श्रीअनिरुद्ध उपासना फाउंडेशनच्या www.aniruddhafoundation.com ह्या वेबसाइटवरील ‘Click here to Donate Online’ ह्या बटणावरती क्लिक करावे.

२) यानंतर आपल्या स्क्रीनवर दिसणार्‍या फॉर्मवरील माहिती भरुन ‘Donate Now’ ह्या बटणावरती क्लिक करावे. मात्र त्याआधी फॉर्ममधील ’Name’, ’E-mail’, ’Mobile No.’ आणि ’Donation amount’ ही माहिती भरणे व त्याचबरोबर ’Card Payment' किंवा ’Internet Banking' ह्या दोन पर्यायांपैकी एक पर्याय निवडणे गरजेचे आहे.

३) पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सिस्टीमने तयार केलेली पावती आपण दिलेल्या ई-मेलवर संस्थेतर्फे पाठविण्यात येईल.

मला खात्री आहे की जास्तीतजास्त श्रद्धावान ह्या “पेमेंट गेटवे”चा लाभ घेतील व ह्या पवित्र कार्यात आर्थिक हातभार लावतील.

ll हरि ॐ ll   ll श्रीराम ll   ll अंबज्ञ ll