ऑनलाईन/डिजिटल रामनाम वही

बरोबर तेरा वर्षांपूर्वी ऑगस्ट २००५ मध्ये, सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी (परमपूज्य बापू) “अनिरुद्धाज् युनिवर्सल बँक ऑफ रामनाम”चा शुभारंभ केला.

श्रद्धावानांना प्रारब्धाशी लढण्याची ताकद मिळून, जीवनातील समस्यांवर मात करण्यास मदत व्हावी व त्यांच्या जीवनात सुखशांती नांदावी ह्या हेतूने स्थापन झालेली ही आगळीवेगळी बँक आता श्रद्धावानांकरिता एक अनोखी भेट घेऊन आली आहे. ती म्हणजे -  ‘ऑनलाईन/डिजिटल रामनाम वही’!

‘ऑनलाईन/डिजिटल रामनाम वही’चा शुभारंभ करताना “अनिरुद्धाज् युनिवर्सल बँक ऑफ रामनाम”ला अतिशय आनंद होत आहे. हे ऍन्ड्रॉईड ऍप डाऊनलोड करण्यासाठी https://goo.gl/x8oCsW वर क्लिक करा.

ह्या ऍपद्वारे आपण आपल्या ऍन्ड्रॉईड फोन अथवा टॅब्लेटवरून रामनाम वही लिहू शकता. हे ऍप प्लेस्टोअरमधून विनामूल्य डाऊनलोड करता येते. ह्या ऍपमध्ये रामनाम वही विकत घेण्याची व ती लिहिण्याची सोय आहे. ह्या ऍपमुळे कुठेही, अगदी प्रवास करत असतानासुद्धा रामनाम वही लिहिण्याची सुविधा युजरला प्राप्त होऊ शकते. एकदा हे ‘रामनाम वही’ ऍप डाऊनलोड केल्यानंतर ते ऑफलाईनही वापरता येते. जर कोणी अजून आपले रामनाम बँक अकाऊन्ट उघडले नसेल, तर ते ऑनलाईन उघडण्याची सोयही ह्या ऍपद्वारे करण्यात आलेली आहे. रामनाम बँकेमध्ये अगोदरपासून अकाऊन्ट उघडले असल्यास, ‘साईन-अप’च्या वेळेस अकाऊन्ट नंबर द्यावा. ह्या ऍपद्वारे लिहिण्यात येणारी रामनामवही पूर्ण झाल्यावर ती आपोआपच तुमच्या रामनाम बँकखात्यात जमा होईल व जमा वह्यांची नोंद अपडेट केली जाईल.

मला खात्री आहे की प्रत्येकजण ह्या संधीचा आनंदाने लाभ घेईल.

 

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥