न्हाऊ तुझिया प्रेमे - २
सद्गुरु गुणसंकीर्तनाचा महिमा अपार आहे. सद्गुरु अनिरुद्धांवरील श्रद्धावानांच्या प्रेमातूनच अनेक भक्तिरचनांचा उदय झाला. अनेक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ श्रद्धावानांनी ह्या भक्तिरचनांमधून त्यांच्या सद्गुरुंचे गुणसंकीर्तन केले आहे. श्रीकृष्णशास्त्री इनामदार, त्यांच्या पत्नी सुशिलाताई इनामदार, लीलाताई पाध्ये, आद्यपिपा, साधनाताई, मीनावैनी हे सर्व श्रेष्ठ आणि ज्येष्ठ श्रद्धावान होते. त्यांच्या ह्या भक्तिरचनांना सूर आणि स्वरांचे कोंदण लाभले आणि ह्यातूनच जन्म झाला - ‘ऐलतीरी मी पैलतीरी तू’, ‘गाजतीया ढोल नी वाजतीया टाळ’, ‘पिपासा’, ‘वैनी म्हणे’, ‘पिपासा पसरली’, ‘तुम बिन कौन सहारा’, ‘पिपासा-२’, ‘पिपासा-३’ अशा अनेक अभंगरचनांचा.
परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या दिव्यत्वाची ओळख आपल्याला ह्या अभंगांतून होत असते. श्रवणभक्ती हीच प्रत्येक श्रद्धावान भक्ताला भक्तिमार्गावर स्थिर करत असते. अशा ह्या भक्तिरचनांचा आस्वाद प्रत्यक्ष अनुभवण्याची सुवर्णसंधी ‘न्हाऊ तुझिया प्रेमे-२’ ह्या सत्संगाद्वारे सर्व श्रद्धावानांसाठी खास उपलब्ध करण्यात आली आहे. सर्व श्रद्धावानांच्या सोयीकरिता ह्या ‘न भूतो न भविष्यति’ सत्संगाचे स्थळ ‘पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील क्रीडांगण, नेरूळ, नवी मुंबई’ हे असेल. ह्या सत्संगाची सुरुवात मंगळवार दि. ३१ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ४ वा. परमपूज्य बापूंच्या आगमनाने होईल. ह्या भक्तिरसाच्या वर्षावात न्हाऊन निघताना परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू, परमपूज्य नंदाई आणि परमपूज्य सुचितदादा हे स्वत: श्रद्धावानांसोबत असणार आहेत. ह्या अनिरुद्ध प्रेमसागराच्या लाटांवर आरूढ होऊन अनिरुद्धांच्या भक्तिभाव चैतन्यात सचैल न्हाऊन निघण्यासाठी चला सर्वजण तयार होऊ!!!
ह्या सत्संगाच्या कार्यक्रमाचे देणगीमूल्य खालीलप्रमाणे असेल – स्टॅण्ड - १ (Stand 1) रु. 1,000/-
स्टॅण्ड - २ (Stand 2) रु. 500/-
स्टॅण्ड - ३ (Stand 3) रु. 300/-
स्पेशल (Special) रु. 21,000/-
ग्राऊंड - १ (Ground 1) रु. 10,000/-
ग्राऊंड - २ (Ground 2) रु. 5,000/-
ग्राऊंड - ३ (Ground 3) रु. 3,000/-
ग्राऊंड - ४ (Ground 4) रु. 2,000/-
ग्राऊंड - ५ (Ground 5) रु. 1,500/-
ह्या सत्संगाच्या कार्यक्रमाचे देणगीमूल्य स्वीकारण्याची तारीख सर्व श्रध्दावानांना लवकरात लवकर कळविण्यात येईल.
----------------------------------------------------------------
सद्गुरु गुणसंकीर्तन का महिमा अपार है। सदुगुरु अनिरुद्धजी के प्रति श्रद्धावानों के प्रेम में से ही कई भक्तिरचानाओं का उदय हुआ। अनेक श्रेष्ठ और ज्येष्ठ श्रद्धावानों ने इन भक्तिरचनाओं में से उनके सद्गुरु का गुणसंकीर्तन किया है। श्रीकृष्णशास्त्री इनामदार, उनकी धर्मपत्नी सुशिलाताई इनामदार, लीलाताई पाध्ये, आद्यपिपा, साधनाताई, मीनाभाभी यह सभी श्रेष्ठ और ज्येष्ठ श्रद्धावान थे। उनकी भक्तिरचनाओं को सुर और स्वरों से सजाया गया और इसीसे जन्म हुआ - ‘ऐलतीरी मी पैलतीरी तू’, ‘गाजतीया ढोल नी वाजतीया टाळ’, ‘पिपासा’, ‘वैनी म्हणे’, ‘पिपासा पसरली’, ‘तुम बिन कौन सहारा’, ‘पिपासा-२’, ‘पिपासा-३’ जैसी विभिन्न अभंगरचनाओं का।
परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धजी की दिव्यता की पहचान हमें इन अभंगों द्वारा होती रहती है। श्रवणभक्ति ही प्रत्येक श्रद्धावान भक्त को भक्तिमार्ग पर दृढ करती रहती है। ऐसी भक्तिरचनाओं का आस्वाद खुद हाजिर रहकर अनुभव करने का सुनहरा अवसर ‘न्हाऊ तुझिया प्रेमे-२’ नामक सत्संग द्वारा सभी श्रद्धावानों के लिए विशेषरूप से उपलब्ध किया जा रहा है। सभी श्रद्धावानों की सुविधा हेतु इस ‘न भूतो न भविष्यति’ सत्संग का स्थल है ‘पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील क्रीडांगण, नेरुल, नवी मुंबई।’ सत्संग का आरम्भ मंगलवार दि. 31 दिसम्बर 2019 की शाम को 4.00 बजे परमपूज्य बापूजी के आगमन से होगा। इस भक्तिरस की बरसात में नहाने का आनंद उठाते हुए श्रद्धावानों के साथ उपस्थित रहेंगे स्वयं परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू्जी, परमपूज्य नंदाई और परमपूज्य सुचितदादा। तो आईए हम सब अनिरुद्ध प्रेमसागर की लहरों पर सवार होकर अनिरुद्धजी के भक्तिभाव चैतन्य में नहाके पावन होने के लिए तैयार हो जाएं!!!
सत्संग कार्यक्रम की देय राशि निम्नलिखित अनुसार है -
स्टैंड - १ (Stand 1)
रु. 1,000/-
स्टैंड - २ (Stand 2)
रु. 500/-
स्टैंड - ३ (Stand 3)
रु. 300/-
स्पेशल (Special)
रु. 21,000/-
ग्राऊंड - १ (Ground 1)
रु. 10,000/-
ग्राऊंड - २ (Ground 2)
रु. 5,000/-
ग्राऊंड - ३ (Ground 3)
रु. 3,000/-
ग्राऊंड - ४ (Ground 4)
रु. 2,000/-
ग्राऊंड - ५ (Ground 5)
रु. 1,500/-
इस कार्यक्रम की देय राशि स्वीकारने की तारीक जल्द ही श्रद्धावानों को सूचित की जाएगी।