श्रीश्वासम् - मूषक-अर्पण करण्याविषयी माहिती(Mushak offering at Shreeshwasam)
Mushak offering at Shreeshwasam
श्रीश्वासम् उत्सवात सद्गुरू श्रीअनिरुध्द बापूंच्या निर्देशानुसार श्रध्दावान मानवाच्या श्वासक्रियेचे प्रतिक मानला जाणार्या मूषकाचे चित्र काढून त्या मूषकास (श्रीमूलार्कगणेशाच्या चरणी) अर्पण करत आहेत.
यासाठी श्रध्दावानांना चार भाग असलेल्या एका कागदावर सर्वात वरील भागात मूषकाचे चित्र काढून दिलेले आहे व श्रध्दावानांना त्याखाली तीन भागांमध्ये स्वत: तीन मूषक काढायचे आहेत.
हे चार मूषक श्वासप्रक्रियेच्या चार स्थिती दर्शवितात १) पूरक (श्वास आत घेणे) २) अन्त:कुंभक (आत घेतलेला श्वास धारण करणे) ३) रेचक (उच्छवास सोडणे) ४) बाह्यकुंभक (उच्छवासानंतर पुढील श्वास घेईपर्यंतच्या काळातील श्वासस्थिती) या चार मूषकांतील म्ह्णजेच श्वासाच्या चार स्थितींमधील पहिल्या तीन स्थिती मानवाच्या हातात असतात. श्वास सोडल्यावर पुढील श्वास घ्यायचा की नाही हे मात्र मानवाच्या हातात नसून ते सर्वस्वी परमात्म्याच्या (सद्गुरूंच्या) हाती असते. श्रध्दावानांनी मूषक काढून अर्पण करताना या भावाने मूषक काढावा की माझ्या परमात्म्याने (सद्गुरूने) त्याच्या हाती असणारा बाह्यकुंभकाचे प्रतिक असणारा मूषक माझ्यासाठी काढून ठेवला आहे. मला त्याखाली माझा हातात असणार्या तीन मूषकांना अर्पण करायचे आहे. हा मूषक दर्शनास येणार्या श्रध्दावानाने फक्त एकदाच अर्पण करायचा आहे. श्वासक्रियेचे प्रतिक असल्याकारणाने हा मूषक ज्याचा त्याने स्वत:च काढायचा आहे.ll हरि ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll