‘श्रीहनुमान चलिसा’ पठण संबंधित अधिक माहिती
शनिवार, दि. ११ मे ते शुक्रवार दि. १७ मे २०२४ ह्या कालावधीत श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् येथे ’श्री ह्नुमान चलिसा’ पठण आयोजित करण्यात आलेले आहे. ह्या वर्षी, श्रद्धावानांच्या सोयीसाठी, हे पठण, वरील कालावधीत, श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् बरोबरच, पुणे, वडोदरा,रत्नागिरी, मीरज, तसेच मुंबई पश्चिम उपनगर बोरिवली येथील, त्रिविक्रम मठांमध्येही आयोजित करण्यात आले आहे. सर्व त्रिविक्रम मठांमध्ये, सकाळी ८.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत हे पठण होईल व तेथील पठणाच्या दरम्यान ’श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्’ मध्ये होणार्या पठणाचे थेट प्रक्षेपण (Live streaming) करण्यात येईल.मुंबई बाहेरील अथवा लांब अंतरावर राहणार्या इच्छुक श्रद्धावानांना पूर्ण दिवस पठणामध्ये भाग घ्यावयाचा असल्यास त्यांना त्यांच्या नजीकच्या त्रिविक्रम मठाला भेट देऊन ह्या पठणासाठी आपली नावे आगाऊ नोंदवता येतील. तसेच ज्या इच्छुकांना संपूर्ण दिवस पठणामध्ये सहभागी होता येणार नसेल, अशा श्रद्धावानांसाठीही, त्यांच्या सोयीनुसार पठणामध्ये थोडा वेळ सहभाग घेण्याची सोय सर्व त्रिविक्रम मठांमध्ये केलेली असेल.
ह्याची सर्व श्रद्धावानांनी नोंद घ्यावी.
शनिवार, दि. ११ मई से शुक्रवार दि. १७ मई २०२४, इस कालावधि में, श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् में ’श्रीहनुमान चलिसा’ पठन आयोजित किया गया हैं । इस साल भी, श्रद्धावानों की सुविधा के लिए, यह पठन, उपरोक्त कालावधि में, ’श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्’ के साथ-साथ, पुणे, वडोदरा, रत्नागिरी, मीरज, तथा बोरिवली-मुंबई पश्चिम उपनगर के त्रिविक्रम मठों में भी आयोजित किया गया है। सभी त्रिविक्रम मठों में, सुबह ८.०० बजे से रात ८.०० बजे तक, यह पठन होगा और वहाँ के पठन के दौरान, श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् में होनेवाले पठन का सीधा प्रसारण (Live streaming) किया जायेगा। मुंबई के बाहर के अथवा बहुत दूर रहनेवाले इच्छुक श्रद्धावान, अगर पूरा दिन पठन में सम्मिलित होना चाहते हैं, तो वे अपने नज़दीक के त्रिविक्रम मठ में जाकर, इस पठन के लिए, अपने नाम अग्रिम रूप से दर्ज़ कर सकते हैं। साथ ही, जिन इच्छुकों को पूरे दिन के लिए पठन में सहभागी होना संभव ना हों, ऐसे श्रद्धावानों के लिए भी, उनकी सहूलियत के अनुसार, पठन में थोड़े समय के लिए सहभागी होने का प्रबन्ध, सभी त्रिविक्रम मठों में किया गया है।
कृपया सभी श्रद्धावान इसे ध्यानमें रखें।