Mock Drill India - ए.ए.डी.एम. चे डिसास्टर मॅनेजमेण्ट व्हॉलेंटियर्स भारतमातेच्या सेवेसाठी पूर्णपणे सज्ज आणि सतर्क !

Mock Drill India - ए.ए.डी.एम. चे डिसास्टर मॅनेजमेण्ट व्हॉलेंटियर्स भारतमातेच्या सेवेसाठी पूर्णपणे सज्ज आणि सतर्क !

हरि ओम


भारत सरकारने दिलेल्या आदेशांचा आदर करून, आपण सर्व श्रद्धावानांनी, अधिकाऱ्यांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पूर्ण पालन करावे.

आपण AADM चे DMVs सतर्क राहू आणि ७/५/२५ रोजी होणाऱ्या मॉक ड्रिलमध्ये मनापासून सहभागी होऊ आणि भविष्यात काही कृती करण्याची आवश्यकता भासल्यास त्यात सुद्धा सहभागी होऊच.

आपण सर्व अनिरुद्धांचे DMVs सतर्क राहू आणि आपल्या देशाला आणि देशवासियांना मदत करण्यासाठी आपले सर्व प्रशिक्षण आणि कौशल्ये वापरू.

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण आपले अग्निशमन (fire fighters) दल DMV युनिट, Rescue DMV युनिट, प्रथमोपचार आणि पॅरामेडिकल DMV युनिट आणि आपले HAM रेडिओ ऑपरेटर यांना सतर्क ठेवले आहे.

आपण सर्व श्रद्धावान आपल्या देशासाठी एकत्र येऊ आणि आपल्या देशाच्या शाश्वत सुरक्षिततेसाठी आणि आपल्या देशावरील प्रत्येक धोक्याचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी आई जगदंबेला आणि आपले प.पू. सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंना प्रार्थना करूया.


जय हिंद
डॉ पौरससिंह अनिरुद्ध जोशी
प्रेसिडेंट
अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट