मी पाहिलेला बापू - पुस्तक प्रकाशन

आपले सर्वांचे लाडके सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू म्हणजे विविधांगी व वैशिष्ट्यपूर्ण पैलूंनी भरलेले एक अद्वितीय व्यक्तिमत्व! ह्या असाधारण व्यक्तिमत्वाचा वेध घेण्याचा एक प्रयास म्हणून, ‘दैनिक प्रत्यक्ष’चे सन २०१२ व २०१३ चे ‘नववर्ष विशेषांक’ ‘मी पाहिलेला बापू’ ह्या विषयाला वाहिलेले होते. बापूंच्या शालेय जीवनापासून ते वैद्यकीय प्रॅक्टिसच्या काळात अनेकविध लोकांना त्यांचे सान्निध्य लाभले. अशा, बापूंच्या सान्निध्यात आलेल्या अनेकविध लोकांच्या, अनिरुद्धांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू दाखविणाऱ्या, त्या काळातील आठवणी त्यांमध्ये शब्दांकित करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर काही मोजक्या व्यक्तिमत्वांच्या, अलिकडील काळातील आठवणींचाही त्यात समावेश करण्यात आला होता. बापूंच्या आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारे ‘दैनिक प्रत्यक्ष’चे हे दोन्ही अंक अविस्मरणीय असेच ठरले होते.

श्रद्धावानांच्या प्रेमळ आग्रहाखातर, ह्या सर्व लेखांचे संकलन असलेले, "मी पाहिलेला बापू" हे पुस्तक ह्या वर्षी गुरुपौर्णिमेच्या मंगल दिनी, म्हणजेच शनिवार, दि. ८ जुलै २०१७ रोजी प्रथम मराठी व हिंदी ह्या दोन भाषांमध्ये प्रकाशित करण्यात येणार आहे. आज गुरुवार, दि. ११ मे पासून श्रीहरिगुरुग्राम उपासना केंद्रावर, तसेच शनिवार, दि. १३ मे पासून इतर सर्व उपासना केंद्रांवर ह्या पुस्तकांसाठीची आगाऊ नोंदणी इच्छुक श्रद्धावान करू शकतात. ही आगाऊ नोंदणी करण्याची सोय श्रीहरिगुरुग्राम उपासना केंद्रावर गेट नं.५ समोर उभारलेल्या काउंटरवर करण्यात आली आहे. ह्या पुस्तकाची छापील किंमत रु.३५०/- असेल, परंतु आगाऊ नोंदणी करणार्‍या श्रद्धावानांसाठी हे पुस्तक सवलतीच्या दरात, म्हणजे रु.२००/- ह्या किंमतीला उपलब्ध असेल ह्याची सर्व श्रद्धावानांनी नोंद घ्यावी. पुस्तक प्रकाशित झाल्यावर, आगाऊ नोंदणी केलेल्या श्रद्धावानांना पुस्तकाची प्रत मिळण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येईल. तरी श्रद्धावानांनी कृपया याची नोंद घ्यावी व अधिक माहितीसाठी सदर काउंटरवर संपर्क साधावा.

मराठी पुस्तकाच्या ऑनलाईन बुकिंग साठी  https://www.e-aanjaneya.com/productDetails.faces?productSearchCode=MPBMDL  या लिंक वर क्लिक करा. 
 
हिंदी पुस्तकाच्या ऑनलाईन बुकिंग साठी https://www.e-aanjaneya.com/productDetails.faces?productSearchCode=MPBHDL या लिंक वर क्लिक करा. 

मी पाहिलेला बापू - पुस्तक प्रकाशन मी पाहिलेला बापू - पुस्तक प्रकाशन मी पाहिलेला बापू - पुस्तक प्रकाशन मी पाहिलेला बापू - पुस्तक प्रकाशन मी पाहिलेला बापू - पुस्तक प्रकाशन मी पाहिलेला बापू - पुस्तक प्रकाशन मी पाहिलेला बापू - पुस्तक प्रकाशन मी पाहिलेला बापू - पुस्तक प्रकाशन