भव्य चरखा शिबीर २०१४(Mega Charkha Camp)

ऑक्टोबर २००२ या दिवशी अनिरुध्दांनी त्यांची १३ कलमी योजना मांडली. ’चरखा’ हे बापूंनी योजलेल्या तेरा कलमापैकी एक कलम. चरखा चालवण्याचे महत्व बापूंनी आपल्याला ’श्रीकृष्णाचे हात’ या चरखा विशेषांकातील अग्रलेखातून सांगितलेले आहे. बापू म्हणतात, "संकटात सापडलेल्या, दरिद्री झालेल्या, दासी, गुलाम बनलेल्या असहाय्य द्रौपदीला वेळच्या वेळी वस्त्रे पुरविणार्‍या भगवान श्रीकृष्णाच्या हाताची बोटे मला चरख्यात दिसतात. हा कृष्णाचा हात तुम्ही हातात कधी घ्याल?" आता वेळ आहे आपण ह्या श्रीकृष्णाचा हात हातात घेण्याची... ही संधी, पुन्हा एकदा या वर्षी, आपल्या संस्थेतर्फे एका भव्य चरखा शिबीराच्या आयोजनातून उपलब्ध करण्यात आली आहे. हे चरखा शिबीर श्री हरिगुरुग्राम, वांद्रे (पूर्व) येथे आयोजित करण्यात आले आहे.

चरखा, शिबीर

या चरखा शिबीरातून तयार होणार्‍या सूतापासून आपली संस्था विद्यार्थ्यांचे गणवेश तयार करते. दरवर्षी कोल्हापूर येथे आयोजीत होणार्‍या वैद्यकीय व सेवा शिबीरातील गरजू विद्यार्थ्यांना आपली संस्था हे गणवेश पुरवते. यासाठी खूप मोठ्या प्रमाणात सुताची आवश्यकता असते जे आपल्याला चरखा चालवूनच तयार झालेल्या लड्यांमधून मिळते. मग आपला हातभार ह्या पवित्र कामात लागण्यासाठी आपण सर्व श्रद्धावान या संधीचा अवश्य लाभ घेऊया. या चरखा शिबीराचे वेळापत्रक असे आहे:-

सोमवार १९ मे २०१४ ते शुक्रवार २३ मे २०१४ व सोमवार २६ मे २०१४ ते गुरुवार २९ मे २०१४

वेळ - सोमवार ते शुक्रवार - सकाळी १०:०० ते रात्री ८:०० गुरुवार :- सकाळी १०:०० ते सायंकाळी ४:००