भक्तिभाव चैतन्यावर आधारित नवीन वेबसाईटचे प्रकाशन

अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य वेबसाईट अनिरुद्ध प्रेमसागरा - श्रद्धावान नेटवर्क

हरि ॐ,

सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांनी भक्तिभाव चैतन्याची ओळख श्रद्धावानांना दैनिक प्रत्यक्षमधील अग्रलेखांमधून व पितृवचनांमधून करून दिलीच आहे. श्रद्धावानही स्वयंभगवान श्रीत्रिविक्रमाचा सार्वभौम मंत्रगजराबरोबरच भक्तिभाव चैतन्याचा आनंद घेत आहेत.

सद्गुरु श्रीअनिरुद्धांशी प्रेमाने सतत जोडलेले (Connected) रहावे आणि त्यांच्या सतत संपर्कात (Communication) रहावे ही प्रत्येक श्रद्धावानाची इच्छा असते. त्याचबरोबर सद्गुरु श्रीअनिरुद्धांवर प्रेम करणार्‍या आपल्या श्रद्धावान मित्रांशीसुद्धा जुळलेले राहून भक्तिभाव चैतन्यातील परस्परांचे अनुभव जाणून घेण्याची इच्छाही श्रद्धावानांच्या मनात असते.

भक्तिभाव चैतन्यात अधिक चांगल्या प्रकारे समरस होण्यासाठी तसेच नव्याने येणार्‍या श्रद्धावान मित्रांना भक्तिभाव चैतन्याची ओळख करून देण्यासाठी आज ‘रामनवमी’च्या अत्यन्त पावन पर्वावर (१३-०४-२०१९) आपण एक भक्तिभाव चैतन्यमय वेबसाईट लॉन्च करत आहोत.

Link - www.aniruddha-devotionsentience.com

सध्या ही वेबसाईट इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेमध्ये उपलब्ध असेल.

भक्तिभाव चैतन्याचा खजिना उघडून देणारी सर्वसमावेशक अशी ही आगळी वेगळी वेबसाईट, ज्यात आपल्याला भक्तिभाव चैतन्याविषयी जाणून घेता येईल, तसेच फोटो व्हिडीयो व लेखांच्या माध्यमातून सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांचे विविध पैलू अनुभवता येतील आणि श्रद्धावानांना आलेले अनुभव वाचता, बघता येतील आणि इतरांशी शेअरही करता येतील.

या वेबसाईटची आणखी एक खासीयत म्हणजे आपले स्वतःचे ‘अनिरुद्ध प्रेमसागरा - श्रद्धावान नेटवर्क’. यात आपल्याला श्रद्धावानांचे सोशल नेटवर्क बनवता येईल, ज्यायोगे प्रत्येक श्रद्धावान एकमेकांशी जोडला जाऊ शकेल.

ज्याला ज्याला म्हणून सद्गुरुभक्तीच्या आश्रयाने भक्तिभाव चैतन्यात राहून, मन्त्रगजर करत राहून स्वत:चा जीवनविकास करण्याची इच्छा आहे, त्या प्रत्येकाला या वेबसाईटच्या माध्यमातून नक्कीच आधार मिळत राहील. या सोशल नेटवर्क वर श्रद्धावान आपले विचार मांडू शकतील, तसेच आपल्या घरातील सद्‍गुरु पादुकापूजन, सच्चिदानंदोत्सव, नवरात्रि पूजन यासारख्या भक्तिभाव चैतन्यमय प्रसंगांचे फोटो किंवा व्हिडीओज्‌सुद्धा शेअर करू शकतील.

। हरि ॐ । श्रीराम । अंबज्ञ ।

। नाथसंविध्‌ ।

समीरसिंह दत्तोपाध्ये

दिनांक - १३-०४-२०१९

हिंदी      English