कोल्हापूर मेडिकल व हेल्थकेअर कॅम्पची Follow up व Feedback मिटींग

॥ हरि ॐ ॥

Distribution of materials to needy at Kolhapur Medical and Healthcare Camp

 

गेल्या १० वर्षापासून कोल्हापूर येथील पेंडाखळे येथे आपला मेडिकल व हेल्थकेअर कॅम्प होत आहे. कॅम्प झाल्यानंतर सुचितदादांच्या मार्गदर्शनानुसार दर तीन महिन्यांनी आपण या कॅम्पबाबत Follow-up व Feedback मिटींग घेतो. या मिटींगमध्ये अनेक गोष्टींचा आढावा घेतला जातो. आपण वाटलेले साहित्य (कपडे, इतर गरजेच्या व स्वच्छातेच्या वस्तू) योग्य ठिकाणी पोहोचले आहे की नाही हे तपासले जाते. तसेच कॅम्पच्या वेळेस आपण जे सर्वेक्षण करतो त्याचा देखील आढावा घेतला जातो. आपण जे स्वच्छतेचे सामान वाटतो त्याचा योग्य प्रकारे वापर होत आहे की नाही हे प्रत्येक घरात जाऊन पाहिले जाते तसेच त्या सामानाची आवश्यकता ही मोजली जाते, कारण हे सामान आपण दर सहा महिन्यांनी त्या भागात वाटत असतो. आपल्या श्रद्धावान कार्यकर्त्यांना योग्य ती माहिती मिळावी व आपल्या सामानाचे योग्य प्रकारे वितरण व्हावे यासाठी एक प्रश्‍नावली बनवली जाते. या मिटींगमध्ये त्या प्रश्‍नावलीत गरज असल्यास योग्य ते बदल केले जातात. प्रत्येक भागातले डॉक्टर व श्रद्धावान कार्यकर्ते आपआपल्या भागातील गावांमध्ये जाऊन वैद्यकीय तपासणी व विविध रोगांवर केलेल्या उपाययोजनांचा पाठपुरावा करतात. त्यांच्याही निरीक्षणावर या मिटिंगमध्ये चर्चा केली जाते. यंदा ही मिटींग रविवारी दिनांक २ जून २०१३ रोजी कोल्हापूर येथे झाली. या मिटींगमध्ये पुढील उपासना केंद्र सहभागी झाली.

१) सांगली २) मिरज ३) इचलकरंजी ४) पेठ-वडगांव ५) वाटेगांव ६) कासेगांव ७) इस्लामपूर ८) निपाणी ९) गडहिंग्लज १०) कोवाड ११) उत्तुर १२) मुरगुड १३) वारणानगर

Material kept ready for distribution in family-wise sorted bags

 

मी ही या मिटींगमध्ये व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या द्वारे श्रद्धावानांशी संवाद साधला. या मिटिंगमध्ये अनेक चांगल्या सूचना मांडल्या गेल्या. आपले श्रद्धावान सेवक या कॅम्पमध्ये जेव्हा कपडे, इतर गरजेच्या व स्वच्छ्तेच्या वस्तूंचे वाटप करण्यासाठी गावात जातात व त्या गावातील गावकर्यांनी बापूंवर रचलेले अभंग व गजर ऐकून अक्षरश: भारावून जातात. लोकसंगीताच्या धर्तीवर गावकर्‍यांनी म्हटलेली ही गाणी या श्रद्धावानांच्या हृदयाला जावून नक्कीच भिडतात हे निर्विवाद. अनेक श्रीअनिरुध्द उपासना केंद्रांवरील श्रध्दावान जिथे एकत्र येतात येऊन कामाचे नियोजन करतात व एकमेकांच्या मदतीनं ते काम पूर्णत्वास नेतात तेव्हा किती सुंदर गोष्ट घडते हे आपण सांगली दौर्‍याच्या निमित्तने बघीतलेच व हे बापूंचे “अध्यात्म आणि आधार” ही दोन तत्त्वे आधोरेखीत करणारे पेंडाखळे येथील आरोग्य व वैद्यकिय शिबिर पुढील काळात अधिकाअधिक कष्टकरी व गरजूंना लाभदायी ठरेल हे नक्कीच.

॥ हरि ॐ॥