‘ जातवेद ’ ('Jaataveda') - Aniruddha Bapu
परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘ जातवेद ’च्या अर्थाबाबत सांगितले.
‘ जातवेद ’ शब्दाचा एक अर्थ साधारत: असा आहे की जो सर्ववेत्ता आहे असा अग्नी. जो सर्ववेत्ता आहे असा अग्नी, सर्व जाणणारा अग्नी.
‘अग्निमिळे पुरोहितं’ हे ऋगवेदातलं पहिलं वाक्य. (श्रीसूक्तातील पहिल्या ऋचेबद्दल सांगताना बापू म्हणाले) अर्थ ज्यांना लिहून घ्यायचा आहे, सरळ सरळ त्यांनी लिहून घ्यायला हरकत नाही.
हे जातवेदा, सुवर्णाप्रमाणे तेजस्वी कांती असणारी, भक्तांच्या सर्व दुःखांचे हरण करणारी, जिने सुवर्ण व रौप्याच्या अलंकाराच्या माळा धारण केल्या आहेत, जिने सुवर्णाच्या व रौप्याच्या विविध अलंकारांच्या माळा किंवा विविध अलंकार धारण केलेले आहेत, जी चंद्राप्रमाणे सौम्य प्रकाश देणारी व आल्हाद देणारी आहे, जिने तेजस्वी सुवर्ण अलंकार धारण केलेले आहेत, किंवा जिचं सर्व अस्तित्वच सुवर्णमय आहे किंवा जिचं संपूर्ण अस्तित्वच सुवर्णमय आहे, हिरण्यमयी, जिचं सर्व अस्तित्वच सुवर्णमयी आहे अशा त्या सर्व शुभलक्षण संपन्न मातेला माझ्या गृहात व माझ्या कार्यक्षेत्रात येऊन प्रतिष्ठित होण्यासाठी व येऊन कायमचं निवास करण्यासाठी आवाहन करतो. कोणाला सांगितलं गेलं आहे? जातवेदास!
परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘ जातवेद ’च्या अर्थाबाबत सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥