श्रीहनुमानचलिसा पठणासंदर्भात सूचना व शंकानिरसन
हरि ॐ,
आपल्या संस्थेने दि. २१ ते २७ सप्टेंबर ह्या आठवडाभराकरिता श्रीहनुमानचलिसा पठणाचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन केले आहे, हे आपणा सर्वांना माहीतच आहे. ह्या पठणाबाबत काही श्रद्धावानांनी काही शंका उपस्थित केल्या. त्या शंकांच्या निरसनाकरिता पुढील स्पष्टीकरण व काही सूचना देत आहे :
१. हे पठण भारतीय प्रमाणवेळेनुसार (IST) सकाळी ८.०० वाजता सुरू होईल व भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ८.१५ पर्यंत सुरू राहील. मंगळवार, गुरुवार व शनिवारी (२२, २४ व २६ सप्टेंबर रोजी) पठण सकाळी ८.०० ते दुसऱ्या दिवशी सकाळी ८.०० असे २४ तास चालू राहील. पुढील दिवसाचे पठण त्यानंतर अल्पविश्राम घेऊन सुरू होईल.
२. ह्या ऑनलाईन पठणात सहभागी होण्याकरिता पुढीलपैकी एका वेबसाईटला भेट द्यावी :
- अनिरुध्द टी.व्ही वेबसाईट - https://aniruddha.tv/ - अनिरुध्द भक्ती फेसबुक पेज - https://www.facebook.com/AniruddhaBhakti - अनिरुध्द भजन म्युझिक (फक्त ऑडियो) – http://radio.aniruddhabhajanmusic.com/
३. ज्या श्रद्धावानांनी पूर्ण दिवस पठणाकरिता नावनोंदणी केलेली आहे, त्यांनी पुढील वेळापत्रकानुसार पठणात सहभागी व्हावे :
४. ज्या श्रद्धावानांनी पूर्ण दिवसाकरिता नावनोंदणी केलेली नाही, परंतु त्यांची पठणात सहभागी व्हायची इच्छा आहे, त्यांनीदेखील वरील लिंक्सवर जावे व आपापल्या सोयीनुसार पठणात सहभागी व्हावे. एखाद्या दिवशी पठणात सहभागी झाल्यानंतर जर आपण केलेल्या आवर्तनांची नोंद श्रद्धावानाला करायची असेल, तर त्याकरिता पुढील लिंकवर जावे -
www.bit.ly/hanumanchalisapathan
ह्या लिंकवरून नोंदणी करण्याकरिता, पठणात सहभागी झालेल्या दिवशी तुम्ही म्हटलेली आवर्तने मोजणे आवश्यक आहे. कोणी एकापेक्षा अधिक दिवस अशा प्रकारे पठणात सहभागी झाले, तर त्या प्रत्येक दिवसाच्या म्हटलेल्या आवर्तनांची वेगवेगळी नोंद करणे आवश्यक आहे.
५. जर एखाद्या श्रद्धावानाने पूर्णदिवस पठणासाठी नाव दिलेले आहे, पण काही कारणामुळे त्याला त्या दिवशी पठण करणे जमणार नसेल, तर तो आपल्या सोयीनुसार दुसऱ्या एखाद्या दिवशी पूर्णदिवस पठणात सहभागी होऊ शकतो.
६. अगोदर सूचित केल्यानुसार, २१ ते २७ सप्टेंबर ह्या पूर्ण आठवड्यात, दररोज सायंकाळी ८.०० वाजता प्रसारित होणारी नित्य उपासना व त्यानंतरचे सुंदरकांड पठण अनिरुध्द टी.व्ही व फेसबुकवरून प्रसारित केले जाणार नाही.
श्रद्धावानांकडून विचारल्या गेलेल्या शंका व त्यांचे निरसन (FAQs)
प्र. १. - मी पूर्णदिवस पठणात सहभागी होणार आहे. त्या दिवशीच्या माझ्या जेवणांत कांदालसूण वर्ज्य करावे का?
उ. - शक्यतो कांदालसूण टाळणे श्रेयस्कर असले, तरी असे करणे बंधनकारक मुळीच नाही. ह्याबाबतीत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य त्या त्या श्रद्धावानाकडे असेल.
प्र. २ - पठणात सहभागी होण्याकरिता श्रद्धावान वेशासारखी वेशभूषा करणे आवश्यक आहे का?
उ. - पठणात सहभागी होण्याकरिता कुठल्याही विशिष्ट प्रकारची वेशभूषा बंधनकारक नाही.
प्र. ३ - मी भारताबाहेर राहतो. पूर्णदिवस पठणाच्या वेळा ह्या भारतीय प्रमाणवेळेनुसार दिलेल्या आहेत. पठण करण्याकरिता मी कुठल्या वेळा पाळाव्यात?
उ. - वर दिलेल्या वेळापत्रकानुसार, भारताबाहेर राहणाऱ्या ज्या श्रद्धावानांनी बॅच 'A' व बॅच 'B' मध्ये नावनोंदणी केलेली आहे, त्यांनी त्या वेळापत्रकात दर्शविलेल्या वेळा, भारतीय प्रमाणवेळेप्रमाणे पाळाव्यात किंवा आपापल्या सोयीनुसार आपापल्या स्थानिक वेळेप्रमाणे पाळाव्यात; पठणाच्या ‘सांगते’मध्ये मात्र शक्यतो भारतीय प्रमाणवेळेनुसार (भारताच्या पूर्वेकडील ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इ. देशांकरिता मंगळवार, गुरुवार, शनिवार) सायंकाळी ८.०० च्या सुमारास किंवा (भारताच्या पश्चिमेकडील अमेरिका, कॅनडा इ. देशांकरिता बुधवार, शुक्रवार, रविवार) सकाळी ७.४५ च्या सुमारास सहभागी व्हावे.
ज्यांनी नावनोंदणी केलेली नाही, पण जे त्यांना उपलब्ध वेळेनुसार पठण करू इच्छितात, त्यांनी आपण केलेली आवर्तने मोजून ठेवावीत व त्या संख्येची पुढील लिंकवर नोंदणी करावी : www.bit.ly/hanumanchalisapathan
प्र. ४ - पठणादरम्यान मी विश्राम (ब्रेक) घेऊ शकतो का?
उ. - पूर्णदिवस पठणाकरिता नावनोंदणी केलेल्या श्रद्धावानांसाठी आलटून-पालटून १ तासाचा विश्राम (ब्रेक) ठेवलेला आहे. (वर दिलेले वेळापत्रक पहावे)
इतर श्रद्धावान आपापल्या सोयीनुसार पठणात सहभागी होऊ शकतात व हवे तसे विश्राम (ब्रेक्स) घेऊ शकतात. मात्र जर त्यांना फॉर्मद्वारे नोंदणी करायची असेल (वरील उत्तर क्र. ३ मध्ये उल्लेख केल्यानुसार), तर त्या दिवशी केलेली आवर्तने मोजणे आवश्यक आहे.
प्र. ५ - जर माझे इंटरनेट कनेक्शन खंडित झाले व मी ऑनलाईन पठण पाहू शकत नाही आहे, तर काय करावे?
उ. - जर तुमचे इंटरनेट कनेक्शन खंडित झाले, तरी तुम्ही पठण चालू ठेवू शकता. इंटरनेट कनेक्शन पुन्हा प्रस्थापित झाल्यानंतर वेबसाईटशी कनेक्ट होऊन पठण पुढे चालू ठेवावे.
किंवा; जर इंटरनेट कनेक्शन पुरेसे स्ट्राँग नसेल, तर तुम्ही http://radio.aniruddhabhajanmusic.com/ लिंकवर जाऊन फक्त ऑडियोच्या माध्यमातून कनेक्ट होऊ शकता.
॥ हरि ॐ ॥ श्रीराम ॥ अंबज्ञ ॥ ॥ नाथसंविध् ॥