परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘भारतातील सुवर्ण आणि रौप्य ही वैदिक संस्कृतीने घडविलेली ताकद आहे’ याबाबत सांगितले.
भारताकडे अजूनसुद्धा प्रचंड सुवर्ण आहे आणि ते कसं आहे, प्रत्येक माणसाकडे आणि ही तुमची ताकद आहे. ही भारतातल्या प्रत्येक माणसाची भारतीय संस्कृतीने, वैदिक संस्कृतीने घडवलेली ताकद आहे. इकडचं सोनं फक्त सत्ताधार्यांकडे नाही आहे. आणि म्हणून भारतावर कितीही आक्रमणं झाली, तरी त्या भारतीयाचं प्रत्येकाचं वैशिष्ट्य त्याला जपता येतं. आणि त्याच्याकडे मूळ चलन जे आहे विश्वाचं सोनं ते असतंच. आणि ह्यासाठीच वैदिक ऋषींनी बरोबर हे सुवर्ण आणि रौप्य मनुष्याच्या जीवनात नीट बसवलं.
त्यामुळे इतर राष्ट्रांप्रमाणे आपली गत कधी झाली नाही. अनेक आले, किती आक्रमणं झाली मला सांगा, घुण आले, कुशन आले, बार्बर आले, तारतार आले, अनेक यवन आले, ग्रीक आले, त्यानंतर अरबी लोकांनी आक्रमण केली, ब्रिटिशांनी केलं, फ्रेंचांनी केलं, डचांनी केलं, सगळ्यांनी केलं, तरीदेखील भारतीय संस्कृती आणि भारत देश, तग धरुन धडपणे उभे राहिले. ह्याच्यामध्ये जसे आध्यात्म आहे, त्याच्या बरोबरीने ह्या वैदिक ऋषींनी तल्लखपणा दाखवून राजसत्तेला अत्यंत आवश्यक असणारं सुवर्ण त्यांनी प्रत्येकाच्या हातात देऊन, प्रत्येकाच्या घरात ठेवून खरी लोकशाही आणली, असे सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात सांगितले ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥