'प्रत्यक्ष' मधील निवडक महत्वाच्या बातम्या तात्पुरत्या स्वरूपात वेबसाईटवर

हरि ॐ,

सध्या पसरत असलेल्या कोरोना वायरस, "कोविद - १९" च्या अनुषंगाने अनेक ठिकाणी वृत्तपत्र वितरण ३१ मार्च २०२० पर्यंत स्थगित करण्यात आले आहे. जोपर्यंत ही स्थिती पूर्ववत होत नाही, तोपर्यंत वाचकांच्या सोयीसाठी तात्पुरत्या स्वरूपात (on temporary basis) आपल्या दैनिक 'प्रत्यक्ष' मधील काही निवडक महत्वाच्या बातम्या मराठी भाषेत ’Newscast Pratyaksha' या आपल्या वेबसाईटवर वाचायला मिळतील. या मराठी वेबसाईटची URL खालील प्रमाणे आहे.

URL - http://newscast-pratyaksha.com/marathi

आपण आधीपासूनच अशा निवडक महत्वाच्या बातम्या हिंदी व इंग्रजी भाषेत ’Newscast Pratyaksha' च्या वेबसाईटवर देतच होतो. या वेबसाईटवर हिंदी किंवा English या बटनावर क्लिक केले असता, वाचक त्या भाषेमधून निवडक महत्वाच्या बातम्या वाचू शकतात.

URL - http://newscast-pratyaksha.com

।। हरि ॐ ।। श्रीराम ।। अंबज्ञ ।। ।। नाथसंविध्‌ ।।