"हितगुज" स्त्रियांसाठी ई- मासिक

हरि ॐ,

स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालविलेले, स्त्रीजीवनाला सर्वांगांनी परिपूर्ण व संपन्न करण्यासाठी घडविलेले ई- स्त्रीमासिक- "हितगुज" लवकरच प्रकाशीत होणार आहे.

ह्यासाठी सर्व स्तरांवरील, तसेच अगदी कौटुंबिक जीवनापासून नोकरीपर्यंत, स्वत:ची अपत्ये सांभाळण्यापासून स्वत:चा व्यवसाय करण्यापर्यंत, स्वजनांची सेवा करण्यापासून सामाजिक सेवा करण्यापर्यंत - अशा विविध क्षेत्रात असणा‍र्‍या किंवा कुठल्याही क्षेत्रात नसणार्‍यासुद्धा सश्रद्ध स्त्रीसाठीचे हे मासिक म्हणजे तीचे हक्काचे व्यासपीठ आणि मार्गदर्शकसुद्धा.

एवढेच नव्हे, तर स्त्रीसाठी मनोरंजनाची विविध द्वारे उघडून देणारे असे - खास फक्त आणि फक्त स्त्रीयांसाठी.

नऊवारीपासून आधुनिक काळातील उत्कृष्ट फॅशनपर्यंत - अशा प्रत्येक वेशातील स्त्रीसाठी.

प्रथम हे त्रैमासिक असेल, नंतर द्वैमासिक होईल व हळूच दर महिन्याला येऊ लागेल.

सर्व श्रद्धावान स्त्रिया आपले स्वत:चे विचार आणि आपली मते लेखातून मांडू शकतात. कथा, कादंबरी इ. ललितलेख पाठवू शकतात. ऐतिहासिक, सामाजिक, आध्यात्मिक, मनोरंजनात्मक अशा विविध विषयांवरील लिखाण स्वागतार्ह आहे. लेख हे कॉपी केलेले नसावे.

लेख व इतर लिखाण, स्विकारण्याचे किंवा न स्विकारण्याचे अधिकार संपादक मंडळाकडे राखून ठेवले आहेत. वादग्रस्त विषयांवरील लिखाण स्विकारले जाणार नाही.

लेख तुम्ही पत्राद्वारे, इमेलद्वारे किंवा हॅपी होमला प्रत्यक्ष येवून देऊ शकता.

डॉ. सौ. नंदा जोशी कार्यकारी संपादीका आणि आत्मबलच्या सर्व शिक्षिका व विद्यार्थिनी

पत्रव्यवहारासाठी पत्ता : ५५१, हॅप्पी होम, टीपीएस-३, ८ वा रस्ता, जुने खार, खार (पश्चिम), मुंबई- ४०००५२ E-mail : [email protected] दूरध्वनी : ०२२-६६९७०९७७ / ७८

।। हरि ॐ ।। ।। श्रीराम ।। ।। अंबज्ञ ।। ।। नाथसंविध ।।