Have complete faith in God's justice - Sadguru Aniruddha Bapu
In his discourse dated December 25, 2003, Sadguru Aniruddha Bapu tells us that we can know we have made certain mistakes when a crisis occurs. And at such a time, we should not ask why we have encountered such a fate when we have not thought of or done anything wrong because there is complete justice in the court of the Parmeshwar.
Sadguru Aniruddha Bapu further explains how encountering difficulties or obstacles as part of my fate or destiny means that I have certainly committed just as many or infinitely more mistakes. The Parmeshwar is never unjust; therefore, it is important for us to believe in His justice.
Sadguru Bapu then explains how impurity is created, how it causes disease, and what having difficulties in our lives means. Bapu then goes on to tell us what kind of perspective we need towards our problems to identify our mistakes.
सद्गुरु अनिरुद्ध बापू आपल्या 25 डिसेंबर 2003 च्या प्रवचनात सांगतात की कसे संकट आल्यावर आपल्याला आपले काही चुकत आहे हे कळते. अशा वेळेस, 'आपण काहीही वाईट केले किंवा चिंतिले नसताना आपल्या नशिबी असे का आले?' असे म्हणू नये कारण परमेश्वराच्या दरबारात संपूर्ण न्याय आहे.
सद्गुरु बापू पुढे समजावून सांगतात की आपल्या नशिबी अडचणी येतात ह्याचा अर्थ आपण तेवढ्याच किंवा त्यापेक्षा अनंत पटीने जास्त चुका केलेल्याच असतात. परमेश्वर कधीच अन्याय करत नाही आणि म्हणूनच त्याच्या न्यायावर विश्वास ठेवणे महत्त्वाचे असते.
सद्गुरु बापू पुढे स्पष्ट करतात की अशुद्धता कशाने निर्माण होते, ती रोगाला कशी कारणीभूत ठरते व आपल्या आयुष्यातील संकटे म्हणजे नक्की काय. आणि आपल्याला आपल्या चुका कळण्याकरता, आपण संकटांकडे कुठल्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे हेही बापू आपल्याला समजावून सांगतात.