सुवर्ण आणि रौप्य यांचे महत्त्व (The Significance Of Gold And Silver) - Aniruddha Bapu

सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘सुवर्ण आणि रौप्य यांच्या महत्त्वा’बद्दल सांगितले.

Gold And Silver

सुवर्ण आणि रौप्य ह्या दोघांचं एकत्र येणं अत्यंत आवश्यक असतं. फक्त सुवर्ण असेल तरी चालणार नाही, फक्त रौप्य असेल तरी चालणार नाही. सुवर्ण जास्त आहे आणि रौप्य कमी आहे तरी चालणार नाही. आता अर्थात एक किलो सुवर्ण आणि एक किलो चांदी ह्यांची व्यावहारिक दृष्टिकोनातून तुलना होईल का? नाही, किंमत वेगळी वेगळी आहे. पटतं आहे, बरोबर?

त्याचप्रमाणे आयुर्वेदिक गुणानुसार बघायचं झालं, दुसरा point of view, तरी त्यांच्या qualities पूर्णपणे वेगळ्या वेगळ्या आहेत. तिसर्‍या बाजूने आपण बघितलं तर त्याच्यापासून काय काय घडवता येतं? तर सोन्यापासून कुठली वस्तु घडवायची असेल, त्याच्यामध्ये आपल्याला दुसरं घालावच लागतं. बघा, शुद्ध सोन्याची बांगडी तुम्ही केलीत, पटकन त्याचा shape बदलतो, थोडंसं तांब घालावंच लागतं किंवा चांदी घालावी लागते. चांदीची वस्तु घडवताना मात्र त्यात काही घालण्याची आवश्यकता नाही.

पण सोन्याचं बघा, सोनं तुम्ही ठेवलंत, तर काळं पडतं का? हातात बायकांच्या दररोज सोन्याच्या बांगड्या असतात, आपल्या हातात कडं असतं, बरोबर की नाही? पडलं आहे का काळं? नाही, तर चांदीचं असं कडं घालून बघा, काय होतं? आठ दिवसांत काळं पडतं. कोणी म्हणतं घामामुळे पडतं, घाम कशाला, बाजूला नुसतं ठेवून द्या, तिकडे घाम येत नाही, तरी काळं पडतंच. हा जो भेद आहे सगळा, हा भेद असंच जर आपण बघत बघत गेलो, आपल्या मूळ मूळापर्यंत गेलो, कि लक्षात येतं, कि सुवर्ण आणि रौप्य हे दोन basically दोन धातु असे आहेत की ज्यांच्या spectrum मध्ये प्रत्येक transformation power येते. म्हणजे प्रत्येक बदल घडवून आणणारी शक्ति जी आहे, त्या शक्तिची जी विविध expressions आहेत, विविध विभाग आहेत, विविध प्रदेश आहेत, ते सगळे ह्या सुवर्ण आणि रौप्य ह्या spectrum मध्येच सामावलेले आहेत.

म्हणजे काय की सुवर्ण हा धातु आणि रौप्य हा धातु ह्यांच्या विविध combinations मध्ये हे ५%, हे १०%, ते १%, ते ४%, परत ह्या दोघांचं मिश्रण २०%, असं जे काही असेल, त्याचप्रमाणे ह्यांच्या qualities, ह्यांचे गुण जे आहेत, ह्यांचे जे गुण आहेत, ह्यांच्यामुळे होणारे जे रासायनिक गुणधर्म आहेत, ह्यांच्यामुळे होणारे जे व्यावहारिक गुणधर्म आहेत, ते सगळेच्या सगळे गुणधर्म जे आहेत, त्यांच्यामध्ये अशा प्रकारची स्पंदनं आहेत, vibrations आहेत, quantas आहेत, energy forms आहेत, कि जे मानवाच्या जीवनामध्ये आणि निसर्गामध्ये जे बदल होत राहतात, जे बदल घडवून आणणं आवश्यक आहे, त्या सगळ्या बदलांची क्षमता, ह्या दोन धातुंमधल्या ह्या ऊर्जाप्रवाहांमध्ये आहे. आलं लक्षामध्ये? आणि म्हणूनच सुवर्णाला एवढं महत्व प्राप्त झालं.

सुवर्ण आणि रौप्य' यांच्या महत्त्वा’बद्दल सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांनी १६ एप्रिल २०१५ च्या मराठी प्रवचनात जे सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

My Twitter Handle