परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २५ जून २०१५ च्या मराठी प्रवचनात सर्व श्रद्धावानांकडून ‘भगवंत असत्य प्रार्थना' ऐकून घेत नाही, याबाबत सांगितले. भगवंताशी बोलताना काही कथा-व्यथा असेल जरूर मांडा, परंतु कधीही खोटे बोलू नये, अगदी मनातल्या मनातही खोटे बोलू नये. भगवंत हा जातवेद असतो. जे काही घडले त्याक्षणी त्याला ते तसच्या तसं माहीत असते. आपण जे घडले तेवढे फक्त कबूल करायचे. कधीही सबबी देऊ नयेत, खोटी प्रार्थना करू नये. ज्या प्रार्थनेत असत्य आहे ती प्रार्थना भगवंत ऐकूनच घेत नाही, असे आपल्या लाडक्या अनिरुद्ध बापूंनी प्रवचनात सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥