इको फ्रेंडली गणेश मूर्ती पुनर्मिलाप पध्दती
हरि ॐ,
ज्या श्रद्धावानांकडे आज पाच दिवसांच्या गणेशोत्सवाचा पुनर्मिलाप आहे, व रामनाम वह्यांच्या लगद्यापासून बनविलेली इको फ्रेंडली गणेश मूर्ती स्थानापन्न आहे, अशा श्रद्धावानांसाठी परमपूज्य बापूंनी पुढील प्रमाणे पुनर्मिलापाची पर्यायी व्यवस्था सांगितली आहे.
एका बादलीत किंवा टब मध्ये पाणी भरावे. त्यात अक्षता, तुळशीचे पान, दुर्वा व उदी अर्पण करावी. गणेशमूर्ती ह्या पाण्यात सोडावी. मूर्ती पूर्ण विरघळल्यावर ते पाणी झाडांना अर्पण करावे किंवा सोयीनुसार एक / दोन दिवसांनी समुद्रात विसर्जित करावे.
जय जगदंब जय दुर्गे॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥