त्रिविक्रमाचा एकमेव प्रतिनिधी म्हणजे आपण पितो ते पाणी (The only representative of Trivikram is our drinking water) - Aniruddha Bapu

सद्गुरू श्री अनिरुद्धांनी त्यांच्या २० फेब्रुवारी २०१४ च्या मराठी प्रवचनात 'त्रिविक्रमाचा एकमेव प्रतिनिधी म्हणजे आपण पितो ते पाणी' याबाबत सांगितले.

एकमेव प्रतिनिधी

हे जे constant पाण्याचा जो गुणधर्म आहे, पाणी constant आहे, ते तेच आहे. दरवर्षी नवीन होत राहतं. त्या पाण्याला ‘नार’ म्हटलेलं आहे. आणि नारयणि नमोऽस्तु ते। आलं लक्षामध्ये? शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोऽस्तु ते। पटतंय? Got it? आणि ती नारायणी! म्हणजेच काय की हे जे जल ह्या पृथ्वीवरचं, ते जल ते त्या त्रिविक्रमाने त्या आदिमातेच्या चरणांशी, चरणांवर केलेला अभिषेक असतो.

१८ प्रभावकेंद्रं आठवा उपनिषदामधली, त्यांच्यामधलं जलमंदिर आठवा! पटलं? जलमंदिर आठवा. जलमंदिराच्या भिंतीने, भिंतीसुद्धा कशाच्या आहेत? जलाच्या, पायर्‍याही कसल्या आहेत, जलाच्या आहेत आणि त्याच्यावर पाऊल ठेवलं तरीसुद्धा काय होतं? ते काही आत जात नाही आहे. पटतंय? हे ते जल आहे. हे ते नार आहे, ती नारायणी आहे. मग ह्या पृथ्वीतलं प्रत्येक जल जे आहे, जे तुम्ही प्राशन करतात, कपडे धुताना जे वापरतात, ते वेगळं. जे पाणी आपण पितो ते काय आहे, तेच तीर्थ म्हणूनच प्यावं लागतं.

ती भावना आपल्या मनामध्ये असलीच पाहिजे. हे जल जे आहे, नार जे आहे, ते कायम काय आहे, तो जो वैश्वानर आहे, आठवला शब्द? कोण वैश्वानर. हा जो वैश्वानर आहे त्याने उत्पन्न केलेलं हे वैश्विक जल आहे. काय आहे? वैश्वानराने, एक वैश्वानर आहे, वैश्वानर एकच असतो, बरोबर? त्या वैश्वानराने उत्पन्न केलेलं हे एकमेव वैश्विक जल आहे.आणि वैश्वानर म्हणजे काय? जठराग्नी. आपल्या जठरात जो अग्नी असतो, जो आपल्या सगळ्या देहाचा कार्यभार चालवतो, तो वैश्वानर आहे. वैश्वानराने केलेलं जे पिण्यासाठीचं पाणी आहे, ते जल आहे आणि आपल्या सगळ्या वेदांनी काय सांगितलंय, वैश्वानर राहतो कुठे? आपल्या शरीरामध्ये. अग्नी राहतो कुठे? तर शरीरातील जलामध्ये. म्हणजेच काय त्रिविक्रमाचा एकमेव प्रतिनिधी म्हणजे आपण पितो ते पाणी. नुसतं आजूबाजूला असणारं पाणी नव्हे. जे पाणी आपण पितो ते काय आहे, ह्या वैश्वानराचं म्हणजे ह्या त्रिविक्रमाचा एकमेव प्रतिनिधी आहे, असे सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात सांगितले ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

My Twitter Handle