स्मरण (The constant remembrance of The God)

सद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘स्मरण(The constant remembrance of The God)’ याबाबत सांगितले.

बघा! आपल्याला दोन्ही प्रकारच्या जाणीवा होत असतात. एक जाणीव असते की अरे, अरे ही गोष्ट मला करायलाच पाहिजे. त्याचबरोबर त्याचवेळेस दुसरी जाणीव असते की नाही ही गोष्ट मी करता कामा नये, हा विचार नाही जाणीव असते बरोबर. अगदी साधं उदाहरण घ्यायचं झालं तर बघा आपण जिन्यावरुन पायर्‍या उतरतो, पायर्‍या उतरताना आपलं लक्ष नाही आहे, अशी आपली पायरी, पाय जातो आणि जात जात लक्षात येतं अरे इथे पायरी नाही आहे. आपला पाय काय होतो? अडखळतो. एकाच वेळी दोन्ही जाणीवा काम करत असतात पाय पुढे टाकायचा पण आहे आणि टाकायचा नाही पण आहे आणि मग काय होतं इथे, जर जाणीव नसेल तर आपण ढपकन पडतो.

अशा विरूद्ध जाणीवा एकाच वेळेस आपल्या भल्यासाठी वापरायच्या असतील, आलं लक्षामध्ये ह्याची दोन टोक ह्या जाणीवेची म्हणजे काय? अग्नितत्त्व आणि षोमतत्त्व. मग जिन्याचं उदाहरण का घेतल? त्याच्यामध्ये क्रम आहे ना, तो क्रम चुकला की मनुष्य पडलाचं, पटतय. त्यामुळे ह्यावर्षी आता किती वर्ष झाली आपण म्हणतो ते हनुमानचालिसा सांगा. सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, तेरा सालातलं हे सातवं वर्ष. हनुमानचालिसा आपण म्हणतो आहोत ९५ पासून, ९७ पासून बरोबर. पण दर महिन्याला स्पेसिफीक महिन्याला आपण २००७ सालापासून सुरुवात केली. ज्यांनी आत्तापर्यंत दरवर्षी म्हटलयं अतिशय उत्कृष्ट, पण ह्यावर्षी पासून तरी म्हणायला सुरुवात करा.

आयुष्यामध्ये किती चुका केल्यात ह्याची लिस्ट करत बसू नका, खरचं सांगतो मनापासून. पण आपलं जीवन बदलायचं आहे ही आपली प्रत्येकाची जी भावना आहे तर खरचं जीवन तुम्ही बदलू शकता पण त्यासाठी तुम्हाला चांगला कारागीरच पाहिजे. तुम्ही म्हणाल माझं घर बांधीन मीच स्वत: एकटा बांधीन तरी बांधून पूर्ण होईल का मला सांगा? पाया मीच खणणार तुम्हाला आहे का नॉलेज? नाही आहे, मटेरिअल मीच स्वत: वाहून नेणार आणि घर बांधेपर्यंत, बांधलच तुम्ही मोठ जर चार खोल्यांच जरी तरी तुमच वय ऐंशी वर्षाचं झालं असेल नि घरात जायच्या ऐवजी... तशी जायची वेळ येईल बरोबर.

मग असा अट्टाहास कशासाठी? आणि ती करायला बसलेली आहे, तिचा तो पुत्र करायला बसलेला आहे आमच्यासाठी. आम्हाला फक्त स्मरण करायचय, पटतय आणि केवळ हनुमानचालिसासाठी ‘स्मरण’ हा शब्द प्रत्येकवेळी नामजप करताना लक्षात ठेवा की राम, राम, राम म्हणू, जरूर म्हणा त्या दिवसाला साईराम, साईराम म्हणत रहा, पण एकदा तरी साईबाबा डोळ्यासमोर दिसले पाहिजेत म्हणजे आठवले पाहिजेत. एकदा तरी साईबाबांची एखादी गोष्ट, एखादा अनुभव आपल्या मनाला पटकन तरळून गेला पाहिजे, हे स्मरण जास्त महत्वाचं आहे.

सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात ‘स्मरण’ याबाबत जे सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता

 

ll हरि: ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll