वदनी कवळ घेतां नाम घ्या श्रीहरिचे (While eating a single morsel of food, chant the name of God) - Aniruddha Bapu
सद्गुरू श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २० फेब्रुवारी २०१४ च्या मराठी प्रवचनात 'वदनी कवळ घेतां नाम घ्या श्रीहरिचे' याबाबत सांगितले.
जेवतांना आम्ही काय करतो? चला बापूंनी सांगितलंय ना 'अन्नग्रहणसमये स्मर्तव्यं नाम श्रीहरे:..' म्हणजे जेवायच्या आधी म्हणायचं, जेवतांना विसरून जायचं. Actually काय सांगितलंय? प्रत्येक घासाच्या वेळी देवाचं नाव (नाम) घ्यायला. ते शक्य नाही, मला माहिती आहे. Agree, totally no problems. पण एखादा तरी घास, आपण ते श्लोक म्हटल्यानंतर एखादा तरी घास आपण राम म्हणून घेतो का? श्लोक म्हटला की चला, बापूंनी सांगितलेलं सगळं केलं.
अरे, काय सांगितलंय बापूंनी? त्या श्लोकात जे सांगितलंय ते महत्वाचं आहे ना? आम्ही फक्त श्लोक म्हटला की संपलं. त्या श्लोकाचा अर्थ आम्हाला माहीत असूनसुद्धा उपयोग काहीच नाही. एक घास तरी देवाचं नाव (नाम) घेऊन घ्या. तोंडात घास एक तरी चावतांना राम राम राम राम म्हणत म्हणा. सगळ्या घासाला म्हणा असं माझं मुळीच म्हणणं नाही आणि रामदास स्वामींचं पण नव्हतं.
पण पहिला घास घेताना तरी देवाचं नाव (नाम) घ्या. ते पण आम्ही कधी केलेलं नाही. पाणी पिताना म्हणून घोट घोट पाणी प्या. दिवसभर पाणी पीत रहा. त्रिविक्रम तुमच्या शरीरात जे स्थूल पातळीवर कार्य करतो, ह्या अल्गोरिदम त्याचं जे कार्य करतो ते पिण्याच्या पाण्यामधूनच आहे हे लक्षात ठेवा, असे सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात सांगितले ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥