Hari Om,
ह्या वर्षी, अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजेमेंट, दिलासा मेडिकल ट्रस्ट अॅण्ड रिहॅबिलीटेशन सेंटर आणि श्री अनिरुद्ध आदेश पथक यांच्या संयुक्त विद्यमाने, रविवार, दिनांक २१ एप्रिल २०२४ रोजी महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
इच्छुक रक्तदात्यांच्या सोयीसाठी, रक्तदानासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय माहिती मराठी भाषेत, सोबत दिलेल्या पोस्टमध्ये देण्यात आली आहे.
रक्तदानासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय माहिती (PDF)
1. वय
जर तुमचे वय १८ ते ६५ वर्षांच्या दरम्यान असेल तर तुम्ही रक्तदान करू शकता.
जर तुम्ही वयाच्या ६० वर्षानंतर पहिल्यांदा रक्तदान करत असाल तर तुम्ही रक्तदान करू शकत नाही.
2. हिमोग्लोबीन
जर तुमचे हिमोग्लोबीनचे प्रमाण १२.५ gm/dl पेक्षा जास्त असेल तर तुम्ही रक्तदान करू शकता.
जर तुमचे हिमोग्लोबीनचे प्रमाण १२.५ gm/dl पेक्षा कमी असेल तर तुम्ही रक्तदान करू शकत नाही.
3. वजन
जर तुमचे वजन ४५ किलोग्रॅमपेक्षा जास्त असेल तर तुम्ही रक्तदान करू शकता.
जर तुमचे वजन ४५ किलोग्रॅमपेक्षा कमी असेल तर तुम्ही रक्तदान करू शकत नाही.
4. मला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे
जर तुमचा रक्तदाब औषधांच्या सहाय्याने नियंत्रित असेल तर तुम्ही रक्तदान करू शकता.
5. मला मधूमेह आहे
जर तुम्ही मधुमेहाच्या गोळ्या घेत असून तुमची रक्तातील साखर नियंत्रणात असेल तर तुम्ही रक्तदान करू शकता.
जर तुम्ही इन्सुलीन घेत असाल तर तुम्ही रक्तदान करू शकत नाही.
6. मी अलीकडेच बाळाला जन्म दिला आहे
जर प्रसुती होऊन १२ महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला असेल तर तुम्ही रक्तदान करू शकता.
जर प्रसुती होऊन १२ महिनेही झाले नसतील तर तुम्ही रक्तदान करू शकत नाही.
7. मी बाळाला स्तनपान देत आहे
जर स्तनपानाचा कालावधी संपला असेल तर तुम्ही रक्तदान करू शकता.
जर अजुनही बाळाला स्तनपान सुरू असेल तर तुम्ही रक्तदान करू शकत नाही.
8. माझी नुकतीच गर्भपाताची शस्त्रक्रिया झाली आहे
जर शस्त्रक्रिया होऊन ६ महिने झाले असतील तर तुम्ही रक्तदान करू शकता.
जर शस्त्रक्रिया होऊन ६ महिनेही झाले नसतील तर तुम्ही रक्तदान करू शकत नाही.
9. मला मासिक पाळी येत आहे
मासिक पाळीचा कालावधी पूर्ण झाल्यावर तुम्ही रक्तदान करू शकता.
मासीक पाळी सुरू असेल तर तुम्ही रक्तदान करू शकत नाही.
10. ही औषधे घेत असलेल्या लोकांना रक्तदान करण्याची परवानगी आहे
1) गर्भनिरोधक गोळ्या / औषधे 2) वेदनाशामक 3) जीवनसत्त्वे 4) कोलेस्ट्रॉल कमी करणारे औषध 5) मधुमेहासाठी तोंडाने घ्यायची औषधे (ओरल डायबिटीस औषधे)
11. ही औषधे घेत असलेल्या लोकांना रक्तदान करण्याची परवानगी नाही
1) इन्शुलिन 2) रक्त पातळ करणारे औषध 3) थायरॉईड औषधे (हायपरथायरॉईड व हायपोथायरॉईड) 4) केमोथेरपी औषधे 5) हार्टफेल्युअर औषधे
(जर तुम्ही कोणतीही लस घेतली असेल तर रक्तदान करू नका. अधिक माहितीसाठी तुमच्या स्थानिक डॉक्टरांना फोन करा.)
12. या वैद्यकीय समस्या असलेल्या लोकांना रक्तदान करण्याची परवानगी नाही
1) कर्क रोग
2) गंभीर अॅलर्जी
3) रक्तविकार
4) संधिवात
5) मूत्रपिंड निकामी होणे
6) हार्ट फेल्युअर / हृदयरोग
7) कुष्ठरोग
8) एसटीडीज्(लैंगिक संक्रमित रोग)
9) यकृत निकामी होणे
10) थायरॉईड रोग
11) मानसिक आजार
12) आकडी / सीजर डिसऑर्डर
13) दमा
13. प्रतीक्षा करा
ही औषधे घेत असलेल्या लोकांना त्यांचे डोस पूर्ण झाल्यानंतर काही काळ प्रतीक्षा करावी लागेल आणि नंतर ते भविष्यात रक्तदान करू शकतात
1) प्रतिजैविक (Antibiotics) औषधे असल्यास रक्तदान २ आठवड्यानंतर करावे. 2) प्रोस्टेट औषधे 1-6 महिने 3) अँटीफंगल औषधे (बुरशीजन्य संसर्गासाठी औषधे) 1 आठवडा 4) टीबी औषधे 2 वर्षे
14. मला क्षयरोग आहे
जर तुम्ही क्षयरोगापासून दोन वर्षांपूर्वी पूर्णपणे मुक्त झाला असाल तर तुम्ही रक्तदान करू शकता.
15. माझ्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झालेली आहे
जर तुमच्यावर मोठी शस्त्रक्रिया झालेली असेल (ज्यात तुम्हाला हॉस्पिटल मध्ये भरती होऊन भूल दिली गेली असेल) तर तुम्ही एक वर्षानंतर रक्तदान करू शकता.
16. मी ३-४ महिन्यांपूर्वी रक्तदान केले होते
पुरुष : रक्तदान केल्यावर पुन्हा ३ महिन्यांनंतर रक्तदान करू शकतात.
स्त्रिया: रक्तदान केल्यावर पुन्हा ४ महिन्यांनंतर रक्तदान करू शकतात.
17. मी नुकतेच माझे दात काढले आहेत
दात काढल्यानंतर सहा महिन्यांनी तुम्ही रक्तदान करू शकता.
18. मी नुकतेच माझ्या अंगावर गोंदवून घेतले आहे
जर तुम्ही अंगावर गोंदवून घेतले असेल तर एक वर्षानंतर तुम्ही रक्तदान करू शकता.
English