श्री अनिरुध्द उपासना केंद्र बोरिवली (पश्‍चिम) चे मन:पूर्वक अभिनंदन

हरि ॐ, परमपूज्य बापू आपल्याला गेली १२ वर्ष कॉमप्युटरच्या महत्वाबद्दल सतत सांगत आले आहेत. त्यासाठीच १ जानेवरी २०१४ च्या ’दैनिक प्रत्यक्ष’च्या नववर्ष विशेषांकात आपण "कॉम्प्युटर व सोशल मिडिया"चे महत्व जाणून घेतले. आपल्या संस्थेच्या श्री अनिरुध्द उपासना केंद्र बोरिवली (पश्‍चिम) च्या श्रद्धावान मित्रांनी यावरून प्रेरित होऊन एक ’कॉमप्युटर कोर्स’ सुरु केला आहे. आजवर ह्या कोर्सचा लाभ १८९ श्रद्धावानांनी ह्या प्रशिक्षणात सहभागी होऊन घेतला आहे. ह्याबद्दल मी बोरिवली (पश्‍चिम) उपासना केंद्राचे मन:पूर्वक अभिनंदन करतो. ही माहिती माझ्यापर्यंत आपल्या नावीन वेबसाईट (upasanakendras.aniruddhafoundation.com) ह्या माध्यमातून आली आहे. त्यांनी पाठविलेला मजकूर मी खाली देत आहे. अशा प्रकारे इतर उपसना केंद्र सुद्धा त्यांच्या केंद्रासंबंधित अशी माहिती आमच्यापर्यंत ह्या वेबसाईटच्या माध्यमाने पोहोचवू शकतात. Borivali Upasana center

॥ हरि ॐ ॥   ॥ श्री राम ॥   ॥ अंबज्ञ ॥