ध्येय गाठण्यासाठी शरीर सहाय्यक आहे. (The body helps us to achieve our goals)

सद्गुरू श्री अनिरुद्धांनी त्यांच्या १५ मे २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘ध्येय गाठण्यासाठी शरीर सहाय्यक आहे’ याबाबत सांगितले.

ध्येय गाठण्यासाठी शरीर सहाय्यक आहे. (The body helps us to achieve our goals)

त्याचा जो समय आहे, जीवनकाळ आहे, देहाची अवस्था आहे, त्या अवस्थानुसार प्रत्येक माणसाची development झालीच पाहिजे. पटतेय? आणि हे कशाने होऊ शकतं? बुद्धीचा वापर कशासाठी तर जीवनातला समय नीटपणे वापरण्यासाठी. मग ह्याला मदत कोण करतं? शरीर. मी मनोमय देह म्हणत नाही आहे, प्राणमय देह म्हणत नाही आहे, हे जे दिसतं ना शरीर, ते दृश्य शरीर आहे. दृश्य शरीर.

एक लक्षात ठेवा, मोठ्या आत्म्याच्या गोष्टी लोकं करतात ना, करु देत त्यांना. माझा त्यांना लांबूनच नमस्कार असतो, आणि मी साष्टांग नमस्कार घालायला तयार आहे. पण तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या आत्म्याला राहण्यासाठी ह्या जगात किती जागा आहेत? एकच. तुमचा देह. तुमचं शरीर. तुमचं घर तुमच्या शरीराला राहण्यासाठी आहे, आत्म्याला आणि प्राणांना राहण्यासाठी नाही.

तुम्हाला कळलं पाहिजे मी म्हणजे आत्मा स्वतः माझा जीवात्मा म्हणजे मी, मग त्याला राहण्यासाठी एकच घर आहे, एकच जागा आहे, there is only one place for your soul and which is that? Your own body. देह देवाचे मंदिर, म्हणजे त्या परमात्म्याचे म्हणजे त्या आत्म्याचे मंदिर आहे. आमच्या जीवात्म्याला राहण्यासाठी एकच जागा आहे ह्या पृथ्वीवर, कुठलं घर नाही, कुठली बिल्डिंग नाही, कुठली चाळ नाही, कुठला देश नाही, your own body. आपलं स्वतःचं एकमेव शरीर. पटतंय?

तुम्हाला दोन शरीर आहेत का? नाही. मग त्याची काळजी घ्यायला नको का? पटतं की नाही? जर माझ्या अस्तित्वाचा बेसच मुळी हे शरीर आहे, तर जे कोणी तुम्हाला अध्यात्म मध्ये सांगत असतील की शरीराची काळजी घेणे पाप आहे तर ते चूक आहे. You have to take care of your body very properly. देह (शरीर). कारण बुद्धीचा वापर कधी होईल? तुम्ही तीव्र वेदनेमध्ये आहात, तुझी बुद्धी काम करेल का? तुम्हाला आठ दिवस कोणी खायला नाही घातलं तुमची बुद्धी काम करेल का? तुम्हाला पाण्याशिवाय ठेवलं तुमची बुद्धी काम करेल का? तुमचं नाक दाबून धरलं आणि तोंड दाबून धरलं, तुम्हाला श्वास घेता येत नाही आहे, तुमची बुद्धी काम करु शकेल का? पटतंय? म्हणजेच काय शरीरमपि खलु धर्मार्थ साधनम्॥

आम्हाला माहित पाहिजे कि आम्हाला आमच्या मोठमोठ्या ऋषींनी, पाराशर, वशिष्ठांनी सांगितलंय कि शरीर हेच धर्म म्हणजे संपूर्ण अभ्युदय, चांगला विकास करण्याचं एकमेव एकमात्र साधन आहे. ते पूर्णपणे आमच्या ताब्यात आहे. आम्ही काय खातो, आम्ही काय पितो, आम्ही किती व्यायाम करतो, आम्ही आमच्या शरीराने जे काही करतो ते सगळंच्या सगळं कुठे कारणी पडतं तर आमच्या देहाची नीट निगा राखण्यासाठी.

‘ध्येय गाठण्यासाठी शरीर सहाय्यक आहे’ असे सद्गुरु श्री अनिरुद्धांनी  प्रवचनात सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

 ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

My Twitter Handle