रक्तदात्यांचे मन:पूर्वक अभिनंदन (Blood Donation Camp)

काल दिनांक १२ एप्रिल २०१५ रोजी ‘दिलासा मेडिकल ट्रस्ट अॅण्ड रिहॅबिलिटेशन सेंटर’(Dilasa Medical Trust), ‘अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट’(Aniruddha Academy of Disaster Management) आणि ‘श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन’(Shree Aniruddha Upasana Foundation) या संस्थांतर्फे श्रीहरिगुरूग्राम येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते. दोन महिने आधी ह्या शिबिराची तयारी सुरू केली तेव्हा लक्षात आले की १९९९ पासून करण्यात आलेल्या या रक्तदान शिबीरातून आतापर्यंत ९४,१०७ बाटल्या रक्त जमा केलेले होते आणि सर्वांना खात्री झाली की, येणार्‍या मेगा रक्तदान शिबिरातील रक्तदान आपण १ लाखाचा आकडा सहजतेने पार करू शकू.

Aniruddha Bapu - Blood Donation camp - 2015 pre
Blood Donation camp - 2015

 

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध केंद्रांना रक्तदानाबाबत आवाहन केले गेले. केंद्रांनीही हे आवाहन आनंदाने स्वीकारून दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबीरे आयोजित करून हा एक लाखाचा ‘मैलाचा दगड’ पार पाडण्यात मोलाचा वाटा उचलला. महाराष्ट्रातील विविध केंद्रांतर्फे मागील दिड महिन्यात ३६ रक्तदान शिबिराद्वारे १४२२ बाटल्या जमा झाल्या. त्याचप्रमाणे काल म्हणजेच १२ तारखेला महाराष्ट्रातील १५ केंद्रावर घेण्यात आलेल्या आलेल्या रक्तदान शिबिरात ६०२ बाटल्या रक्त जमा झाले.

काल श्रीहरिगुरूग्राम येथे झालेल्या भव्य रक्तदान शिबिराद्वारे ५२२९ रक्त बाटल्या जमा झाल्या. श्रीहरीगुरूग्राम आणि केंद्रांमार्फत एकूण ५८३१ रक्त बाटल्या जमा होऊन आतापर्यंत झालेले एकूण १०१३६० बाटल्या जमा केल्या गेल्या. म्हणजेच हा ‘मैलाचा दगड’ पार करण्यात ह्या सर्व अनिरुद्ध उपासना केंद्रांचा मोलाचा वाटा आहे. श्रीहरिगुरूग्राम येथे आणि विविध केंद्राद्वारे सहभाग घेऊन केलेल्या रक्तदानाबाबत सर्व श्रद्धावानांचे व कार्यकर्ता सेवकांचे मी मन:पुर्वक अभिनंदन करतो. आपण सर्व जण बापू व मोठ्या आईच्या चरणी अंबज्ञ राहूया.

ll हरि ॐ ll    ll  श्रीराम ll   ll अंबज्ञ ll