गुरुकुल, जुईनगर येथील ‘श्रीअश्वत्थ मारुती पूजन’ (Shree Ashwattha Maruti Poojan)
परमपूज्य सद्गुरु बापू नेहमीच आपल्या बोलण्यातून श्रीहनुमंताचा (Shree Hanumant) उल्लेख "माझा रक्षकगुरु" असा करतात व बापूंनी तसे स्पष्टपणे आपल्या श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराजात लिहीलेही आहे. त्यांच्याच बोलण्यानुसार प्रत्येक भक्ताची भक्तीमार्गाची सुरुवात हनुमंतापासूनच होते. श्रीहरिगुरुग्राम येथे दर गुरुवारी होणा-या सांघिक उपासनेमध्येसुद्धा "ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नम:" ह्या जपाचा समावेश आहे आणि स्टेजवरील मांडणीमध्ये बापूंच्या बैठकीच्या मागे आपण रक्षकगुरु श्रीहनुमंताची मोठी तसबीरही बघतो. एवढेच नव्हे तर श्रीअनिरुध्द गुरुक्षेत्रम्मधील श्रीमद्पुरुषार्थ पुरुषोत्तम यंत्र (क्षमायंत्र) ह्याच्या केंद्रस्थानी पंचमुखीहनुमंतच आहे.
त्याचप्रमाणे प्रत्येक मानवाच्या जीवनात कमीतकमी तीन वेळा येणा-या साडेसातीच्या काळामध्ये प्रारब्धभोगांचा प्रभाव कमी होण्यासाठी व ते भोग भोगण्यास लागणारे सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी श्रीहनुमंताची उपासना अत्यंत फलदायी ठरते असे बापूंनी प्रवचनातून वारंवार सांगितले आहे.
अशा ह्या भक्तोत्तम हनुमंताचा, आपल्या संस्थेतर्फे राबविण्यात येणारा एक महत्त्वाचा उत्सव म्हणजे ‘श्रीअश्वत्थ मारुती पूजन’ (Shree Ashwattha Maruti Poojan). १९९७ साली सुरु झालेला हा उत्सव आजही गुरुकुल, जुईनगर येथे दरवर्षी श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो.
सद्गुरु बापूंनी ज्या शिळेतून स्वत: छिन्नी-हातोडीच्या सहाय्याने श्रीहनुमंताची मूर्ती कोरली, ती शिळा ह्या उत्सवामध्ये सर्व श्रद्धावानांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येते. तसेच दर्शन घेताना सर्व श्रद्धावानांना ह्या शिळेस शेंदूरलेपन करण्याची सुवर्णसंधीही उपलब्ध असते. त्याचप्रमाणे विशिष्ट देणगी मूल्य देऊन श्रद्धावान ह्या हनुमंताच्या शिळेसमोर बसून अभिषेकही करू शकतात. उत्सव काळात संपूर्ण दिवस श्रीपंचमुखहनुमत कवच, श्री संकटमोचन हनुमानस्तोत्र आणि "ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नम:" ह्या जपाची आवर्तनं सुरु असतात.
ह्या वर्षी ‘श्रीअश्वत्थ मारुती पूजन’ हा उत्सव मागच्या आठवड्यात दि.१५ ऑगस्ट रोजी साजरा झाला तसेच पुढील २२ ऑगस्ट, २९ ऑगस्ट, व ५ सप्टेंबर २०१५ ह्या दिवशी सकाळी ८:०० ते रात्रौ ९:०० वाजेपर्यंत साजरा होणार आहे.
उत्स्व स्थळ: ’श्री सद्गुरु निवास’, "गुरुकुल" जुईनगर, नवी मुंबई॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥