दैनिक प्रत्यक्षमधील विशेष बातम्यांसंबंधी सूचना

हरि ॐ,

दिनांक ६ मार्च २०१८ पासून दैनिक प्रत्यक्षमध्ये तिसर्‍या महायुद्धाशी निगडीत विशेष बातम्या देण्यात येत आहेत. या बातम्यांची हेडलाईन किंवा पूर्ण बातमी अनेक वाचक उत्साहाच्या भरात व्हॉट्‍सऍप किंवा तत्सम सोशल मिडियावर शेअर करीत आहेत. ही चूकीची गोष्ट आहे. पूर्ण बातमी किंवा हेडलाईन शेअर करण्याऐवजी वाचक प्रत्यक्षमध्ये आलेल्या बातम्यांवर त्यांच्या प्रतिक्रिया, मत सोशल मिडीयाद्वारे देऊ शकतात. तरी सर्व वाचकांनी कृपया याची नोंद घ्यावी.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥