नवरात्री उपासनेबाबत सूचना

हरि ॐ, "नवरात्रीमध्ये दररोज अनिरुद्ध चलिसा ११ वेळा म्हणायची आहे." अशा प्रकारचा मेसेज माझ्या नावाने WhatsApp वर फिरत असल्याचे अनेकांनी माझ्या निदर्शनास आणून दिले आहे. श्रद्धावान त्यांना भावेल ती उपासना नवरात्रीत करू शकतात व त्याचप्रमाणे सद्‍गुरुंच्या शिकवणीनुसार आपापली उपासना निवडू शकतात. सद्‍गुरुंची, सद्‍गुरुतत्वाची उपासना ही कायमच श्रेयस्कर असते यात काही वाद नाही. परंतू वरील प्रकारे नवरात्रीमध्ये पठण करण्याकरिता मी कुठल्याही प्रकारे मेसेज पाठविलेला नाही. आपले स्वतःचे महत्व वाढविण्याकरिता काही जण अशा प्रकारे नावाचा दुरुपयोग करतात व श्रद्धावानांना संभ्रमामध्ये टाकतात. महत्वाचे मेसेजेस्‌ मी नेहमीच आपल्या नेहमीच्या ग्रुपमध्ये टाकून सर्वांपर्यंत पोहोचवित असतो. तरी सर्व श्रद्धावानांनी कृपया याची नोंद घ्यावी.  

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥