अनिरुद्ध प्रेमसागरा मोबाइल अ‍ॅपसंबंधी सूचना

हरि ॐ,

सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळातही बापूंनी आपल्या सर्व श्रध्दावानांसाठी सांघिक उपासनेचा सुंदर मार्ग इंटरनेटच्या माध्यमांतून खुला करून दिला आहे. अनेक श्रध्दावान व्हॉट्‌सॲप द्वारे दररोज या विविध उपासनांबाबत मनापासून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. परंतु, सध्याची परिस्थिती लक्षात घेता अधिकृत सूचनांनुसार व्हॉट्‌सॲपच्या सेटिंगमध्ये बदल करण्यात आले आहेत.

मात्र त्याचवेळेस ’अनिरुध्द प्रेमसागरा - श्रध्दावान नेटवर्क’ - हे सर्व श्रध्दावानांसाठी असणारे सोशल नेटवर्क, आपल्यासाठी सहज मार्ग बनला आहे. यातही श्रध्दावानांना अधिक सोईचे व्हावे यासाठी आपण याचे मोबईल ॲपदेखील लॉन्च केले आहे. सध्या हे ॲप ॲन्ड्रॉईडसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

लिंक - https://play.google.com/store/apps/details?id=com.aniruddhapremsagara

तसेच iOS चे ॲप सुद्धा लवकर उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयास आहे. तोपर्यंत iOS युझर्स वेबसाईट च्या माध्यमातून या नेटवर्कचा लाभ घेऊ शकतातच.

वेबसाईटची लिंक - www.aniruddhapremsagara.com

या नेटवर्कमध्ये-लॉग इन करून आपण आपल्या प्रतिक्रिया, बापूंचे आपल्याला आलेले अनुभव इतर सोशल मिडीयांप्रमाणेच येथे पोस्ट करू शकतो. त्याशिवाय फोटो, व्हिडीओ देखील श्रध्दावान या नेटवर्कवर पोस्ट करु शकतात. हे नेटवर्क वापरण्याबद्दलचा एक विडिओ आपण लवकरच पाठवणार आहोत.

ह्या नेटवर्क चे वैशिष्ठ्य म्हणजे हे श्रद्धावानांनी श्रद्धावानांसाठी बनवलेले आपले स्वतःचे एक आगळे-वेगळे सोशल नेटवर्क आहे. ’अनिरुध्द प्रेमसागरा’ या श्रध्दावान नेटवर्कचा उपयोग श्रध्दावान actively करतील अशी माझी खात्री आहे.

II हरि ॐ II श्रीराम II अंबज्ञ II II नाथसंविध्‌ II