अनिरुद्ध चलिसा स्तोत्रमंत्र - सामूहिक अखंड पठण

।। हरि ॐ ।।

सद्गुरु श्रीअनिरुद्धांनीच मानव धर्माला परमेश्वरी ऐश्वर्य प्राप्त करून देणारा, म्हणजेच भक्तिच्या सहाय्याने निष्काम कर्मयोग शिकवणारा मार्ग आम्हाला दिला; आमच्या बापूंनीच आम्हाला त्रि-नाथांच्या भक्तीचा सहजसुंदर मार्ग दाखवला, सद्गुरु श्रीअनिरुद्धांनीच आमच्या जीवनात अंबज्ञता आणली, सद्गुरु श्रीअनिरुद्धांमुळेच आमच्या जीवनात आमचे नाथसंविध् सक्रिय आहे, आमच्या जीवनात स्वस्तिक्षेम आहे. सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनीच आम्हाला "सार्वभौम" असा भगवान श्रीत्रिविक्रमाचा मंत्रगजर दिला आणि या मंत्रगजराच्या फलश्रुतीच्या रूपात त्रिविक्रमाची १८ वचनेही दिली. हे सर्व केवळ सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या कृपाआशीर्वादामुळेच आम्हा श्रद्धावानांना मिळाले. हा आम्हा बापुभक्तांचा दृढभाव आहे आणि सद्गुरुंप्रती अंबज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही बापुभक्त दर वर्षी आद्यपिपीलिकापांथस्थ-विरचित म्हणजेच आद्यपिपा-विरचित ‘अनिरुद्धचलिसा’ या स्तोत्राचे १०८ वेळा सामूहिक अखंड पठण करत असतो.

अनिरुद्ध चलिसा स्तोत्र यह इक मन्त्र महान अपार । सर्ब कामना पूरन प्रति ब्यर्थ बचन ना जाय ।।

वरील शब्दांत स्वत: आद्यपिपांनी या स्तोत्रमंत्राचा महिमा वर्णिलेला आहे. अनिरुद्धचलिसा स्तोत्राच्या सामूहिक पठणात सामिल होऊन आम्ही, सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांचे श्रद्धावान भक्त आमच्या सद्गुरुंप्रती अंबज्ञता व्यक्त करतो.

व्यक्तिगत उपासनेबरोबरच सामूहिक उपासनेचे अनन्यसाधारण महत्व जाणून अनिरुद्धचलिसा स्तोत्राच्या सामूहिक अखंड पठणाचे दरवर्षी आयोजन केले जाते. यावर्षी शनिवार दिनांक २७ ऑक्टोबर २०१८ रोजी अनिरुद्धचलिसा स्तोत्राचे सामूहिक अखंड पठण होत असून श्रद्धावान बापू भक्त उत्साहात या कार्यक्रमात सहभागी होत आहेत, होणार आहेत.

चला तर मग, भेटूया २७ ऑक्टोबर रोजी श्रीहरिगुरुग्राम येथे; या अनिरुद्धभक्तित, या अनिरुद्धप्रेमात न्हाऊन निघण्यासाठी.........

अनिरुद्धचलिसा स्तोत्र अखंड सामूहिक पठण : शनिवार, दि. २७-१०-२०१८ वेळ - सकाळी ९:०० ते रात्रौ ९:०० वाजेपर्यत. स्थळ - श्रीहरिगुरुग्राम (न्यू इंग्लिश स्कूल), वान्द्रे.


।। हरि ॐ ।।
सद्गुरु श्रीअनिरुद्धजी ने ही मानव धर्म को परमेश्वरी ऐश्वर्य प्राप्त करा देनेवाला, अर्थात् भक्ति की सहायता से निष्काम कर्मयोग सिखानेवाला मार्ग हमें दिग्दर्शित किया; हमारे बापू ने ही हमें त्रि-नाथों की भक्ति का सहजसुंदर मार्ग दिखाया, सद्गुरु श्रीअनिरुद्धजी ही हमारे जीवन में अंबज्ञता ले आये, सद्गुरु श्रीअनिरुद्धजी के कारण ही हमारे जीवन में हमारा नाथसंविध् है, हमारे जीवन में स्वस्तिक्षेम है। सद्‍गुरु श्रीअनिरुद्धजी ने ही हमें "सार्वभौम" ऐसा भगवान श्रीत्रिविक्रम का मंत्रगजर दिया और मंत्रगजर की फलश्रुति के रूप में ‘त्रिविक्रम के १८ वचन’ भी दिये। यह सबकुछ केवल सद्गुरु श्रीअनिरुद्धजी के कृपाशीर्वाद से ही हम श्रद्धावानों को प्राप्त हुआ, यह हम बापुभक्तों का दृढभाव है और सद्गुरु के प्रति अंबज्ञता व्यक्त करने के लिए हम बापुभक्त हर साल आद्यपिपीलिकापांथस्थ-विरचित अर्थात् आद्यपिपा-विरचित ‘अनिरुद्धचलिसा’ इस स्तोत्र का १०८ बार सामूहिक अखंड पठन करते हैं।
अनिरुद्ध चलिसा स्तोत्र यह इक मन्त्र महान अपार । 
सर्ब कामना पूरन प्रति ब्यर्थ बचन ना जाय ।।
ऊपरोक्त शब्दों में खुद आद्यपिपा ने ही इस स्तोत्रमन्त्र की महिमा वर्णन की है। अनिरुद्धचलिसा स्तोत्र के सामूहिक पठन में सम्मिलित होकर हम, सद्‍गुरु श्रीअनिरुद्धजी के श्रद्धावान भक्त हमारे सद्गुरु के प्रति अंबज्ञता व्यक्त करते हैं।
व्यक्तिगत उपासना के साथ ही सामूहिक उपासना का अनन्यसाधारण महत्त्व जानकर, अनिरुद्धचलिसा स्तोत्र के सामूहिक अखंड पठन का हर साल आयोजन किया जाता है। इस साल शनिवार दिनांक २७ अक्तूबर २०१८ को अनिरुद्धचलिसा स्तोत्र का सामूहिक अखंड पठन होनेवाला है और श्रद्धावान बापुभक्त हर्षोल्लास के साथ इस कार्यक्रम में सम्मिलित हो रहे हैं, होनेवाले हैं।
चलिये, तो फिर मिलते हैं, २७ अक्तूबर को श्रीहरिगुरुग्राम में; इस अनिरुद्धभक्ति में, इस अनिरुद्धप्रेम में सराबोर होने के लिए....
अनिरुद्धचलिसा स्तोत्र अखंड सामूहिक पठन :
शनिवार, दि. २७-१०-२०१८
वेळ - सुबह ९:०० से रात ९:०० बजे तक
स्थल - श्रीहरिगुरुग्राम (न्यू इंग्लिश स्कूल), बान्द्रा

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥ ॥ नाथसंविध् ॥