सदगुरु श्री अनिरुध्दांनी सुमारे एका वर्षापूर्वीच आपल्याला भक्तिभाव चैतन्य ह्या संकल्पनेची ओळख करून दिली. श्री अनिरुध्दांनी सांगितले की सदगुरुतत्वाच्या नाम, रुप व गुणांमध्ये प्रेमाने पूर्णपणे समरसून जाणे आणि त्याला वेळोवेळी पुन्हा पुन्हा आठवत राहणे, त्याच्याच स्मरणात राहणे म्हणजेच ’सदगुरु भक्तिभाव चैतन्य’.
सद्गुरु भक्तिभाव चैतन्यात रममाण होण्याचा सर्वात सोपा राजमार्ग म्हणजे सदगुरूंवर रचलेल्या अभंगांना प्रेमाने ऐकत राहून, त्याच्याच नामात, रूपात आणि गुणसंकीर्तनात (लीलांमध्ये, गुणांमध्ये) आनंदाने तल्लीन होणे. भक्तीभाव चैतन्य म्हणजे सदगुरुंच्या चिरंतन प्रेमात, कृपेमध्ये त्याच्याच नामाची महती गात, त्याच्याच प्रेमाच्या लाटांमध्ये आकंठ डुंबून सदगुरुंच्या प्रेमाच्या वर्षावात जेथे जेथे आणि जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा सदैव स्वत:ला रममाण करत राहणे!
श्रीहरिगुरुग्राम येथे २१ नोव्हेंबर २०१९ रोजी सद्गुरु श्री अनिरुध्दांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत गूंज उठी पिपासा - भाग १ च्या हिंदी रचनांसह पिपासा ५ चा अभंग प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
अनिरुध्द भजन म्युझिक ॲपवर २५ ऑक्टोबर २०१८ रोजी प्रकाशित झालेला पिपासा ३ अल्बमसंग्रह आणि १४ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रकाशित झालेला पिपासा ४ अल्बमसंग्रहा पाठोपाठ, पिपासा ५ अल्बमसंग्रह सुध्द्दा उपलब्ध करून दिला गेला.
हे अभंग अतिशय सुंदर वाद्यवृंद आणि साउंड सिस्टीमच्या साथीने जेव्हा प्रत्यक्ष गायले गेले, तेव्हा ते अभंग ऐकताना प्रत्येक श्रध्दावान सदगुरु भक्तिभाव चैतन्यात चिंब भिजून गेला होता. ह्या अभंगांमधून प्रत्येक श्रध्दावान मनाने सदगुरुंशी अधिक घट्टपणे जोडला गेला आणि हे सुंदर अभंग ऐकताना प्रत्येक श्रध्दावानाने त्याच अनिरुध्द प्रेमसागराचे भावतरंग प्रत्यक्षात अनुभवले.
आता होणारा महासत्संग सोहळा म्ह्णजे भक्तिभाव चैतन्याची अमर्याद व्याप्ती, श्रध्दावानांचा आपल्या सद्गुरुंवरील शुध्द प्रेमाचा उत्सव या सगळ्याचे आपण प्रत्येकजण साक्षीदार होणार आहोत हे नक्की!
रक्तदान शिबीर
सदगुरु श्री अनिरुध्द आपल्या श्रध्दावान मित्रांना समाजाची नि:स्वार्थ, निरपेक्ष सेवा करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहित करीत असतात आाणि रक्तदान ही अशाच निरपेक्ष सेवांमधील एक अत्यंत महत्त्वाची सेवा आहे.
सद्गुरु श्री अनिरुध्द आपल्या श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराजात आवर्जून सांगतात की परमात्म्याला आवडणार्या ९ पवित्र थेंबापैकी एक म्हणजे गरजू व्यक्तिंना केले गेलेले रक्तदान होय.
मागील महिन्यात महाराष्ट्र राज्यातील आमच्या सर्व उपासना केंद्रांनी रक्तदान शिबीर आयोजित केले.
श्रध्दावान खूप मोठ्या संख्येने ह्या उदात्त कारणासाठी आनंदाने सहभागी झाले व त्यांनी रक्तदान केले. त्या संबंधीचा तपशील खालील प्रमाणे आहे :
|
तारिख |
शिबिराचे स्थळ |
सहभागी झालेले केंद्र |
एकूण जमा झालेले ब्लड युनिट |
१७ नोव्हेंबर |
उल्हासनगर |
उल्हासनगर, अंबरनाथ, टिटवाळा |
१६६ |
दिवा |
दिवा |
१३६ |
डोंबिवली पूर्व |
लोधा हेवन डोंबिवली |
१२० |
आसनगाव |
वाशिंद, आसनगाव, शाहपूर, कसारा, पडघा, अम्बरजे, वाचकोळे |
१०८ |
कल्याण पश्चिम |
कल्याण पश्चिम, कोनगाव, शहाड |
११८ |
कल्याण पश्चिम |
म्हरळगाव |
५२ |
कल्याण पूर्व |
कल्याण पूर्व आणि पिसवली |
६६ |
बदलापूर पूर्व |
बदलापूर (पूर्व, पश्चिम, कात्रप) |
३७६ |
कर्जत |
कर्जत प्रायोगिक केंद्र |
६८ |
भिवंडी |
भिवंडी, ठाकरचा पाडा |
१०६ |
मुरबाड |
मुरबाड, सरळगाव, बांधीवली, किन्हवली, तुळाई, केळेवाडी |
७२ |
२४ नोव्हेंबर |
डोंबिवली पूर्व |
डोंबिवली पूर्व, डोंबिवली एम.आय.डी.सी, आणि ठाकुर्ली |
१७० |
डोंबिवली पश्चिम |
डोंबिवली पश्चिम आणि कोपर |
२२४ |
खारीगाव |
खारीगाव |
११५ |
कळवा |
कळवा |
६६ |
मरोळ |
मरोळ |
८३ |
वेस्टर्न झोन |
जोगेश्वरी पूर्व |
१०७ |
भाईंदर |
भाईंदर |
८५ |
वसई |
वसई |
१५६ |
कुर्ला पश्चिम |
कुर्ला पश्चिम |
१२५ |
उरण |
उरण आणि मुळखंड |
१३६ |
पुणे |
चिंचवडे नगर, पुणे |
५४ |
वरळी गाव |
वरळी गाव |
६६ |
एकूण |
|
|
२७७५ |
पाली वैद्यकीय आणि आरोग्य शिबीर
श्री अनिरुध्द उपासना फांउडेशनतर्फे ह्या वर्षी पाली येथील सुधागड तालुक्यामध्ये पाली वैद्यकीय आणि आरोग्य शिबीर आयोजित केले होते. चिवे, पडसरे आणि वाव्हलोली येथील शाळांमधील ११२२ विद्यार्थी हजर होते आणि त्यांनी आरोग्य व वैद्यकीय सुविधांचा लाभ घेतला. आपल्या सीएसआर टीममधून २९ डॉक्टर व पॅरामेडिकल टीम आणि एकूण १४८ कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांना स्थानिक कार्यकर्त्यांनीही सहाय्य केले.
|