परम पूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २५ जून २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘मोठी आई (आदिमाता चण्डिका) शंखाच्या माध्यमातून आमच्या प्रार्थना ऐकते' याबाबत सांगितले. शंख (conch) लहानशा आवाचाचे रूपांतर मोठ्या आवाजात करतो. दिवसातून एकदा तरी शंख(conch) वाजविला तरी चांगले आहे त्यामुळे दूषित स्पन्दने (वायब्रेशन्स्) निघून जातील; कारण पवित्र स्पंदने निर्माण करून अपवित्र स्पंदनांचा नाश करणे हे शंखाचे मूळ कार्य आहे. या शंखामुळे, जो मनापासून प्रार्थना करेल त्याचे चुकून किंवा अनवधानाने काही चुकले असेल तरी ते शुद्ध होऊन मोठी आईपर्यंत जाते.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥