Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Yuge Yuge Me from album Pipasa 2

Lyrics of Yuge Yuge Me from album Pipasa 2

युगे युगे मी मार्ग चाललो



युगे युगे मी मार्ग चाललो फक्त तुझा बापू।
तुला सोडूनी जाऊ कुठे मी तुजवीण मज कुणी नाही॥

क्रमता मार्गे क्लांत जाहलो भूकतहाने व्याकूळ झालो।
श्रमही संपले मार्ग पुढती तूच जवळ ये ना ॥

सखया माझ्या दीनवत्सला काकुळती मी अनन्यशरणा।
मीपणाची वांझ प्रसूति विभक्ती ही मारे मजला ॥

पिपा सांगतो ऐसी माझी स्थिती केली ह्या काळ्याने।
घट्ट उभा हा मीपण लुटण्या हाच खरा कैवारी ॥

हात पसरूनि जवळ घेतले आनंदाचे डोही बुडविले।
पिपा विनवितो एकदा तरी लुटून घ्या रे ह्याच्याकडूनी ॥