Lyrics of Yeda Lagale from album Bol Bol Vaache

9. यडं लागलं
यडं लागलं, यडं लागलं, ह्या बापुचं यडं लागलं ।
अनिरुद्धाचं यडं लागलं, या बापुचं यडं लागलं ॥धृ॥
एका गुरुवारी सहज म्हणून आले जी।
माझ्या बापुची, बापुची गोठ ऐकली जी।
तवापासूनी सोताला इसरुन गेले जी।
माझा जीव ह्यो ह्याच्या पायाशी व्हाईला जी ॥१॥
माझा बापु ह्यो शिरडीला घेऊन गेला जी।
तिथं बाबाची, बाबाची गोठ सांगली जी।
आम्ही नव्यानं, नव्यानं शिरडी पाहिली जी।
तवापासूनी बेभान आम्ही झालेा जी ॥२॥
एका वरसानं अक्कलकोटाला आलो जी।
तिथं स्वामीची, स्वामीची पूजा केली जी।
राती बापुचा, बापुचा जागर केला जी ।
साक्षात इट्टल, इट्टल धावून आला जी ॥३॥