Sadguru Aniruddha Bapu

VidaGhyaHoAniruddha

VidaGhyaHoAniruddha
१३. विडा घ्या हो अनिरुद्धा

विडा घ्या हो अनिरुद्धा। भोजन भावाचे केले ।।
अर्पितो तांबुल मी । मागतो चरणांची सेवा।।१।।
कात हा कडू बोध। आणी रंगत जीवनी ।।
पान लाविले सेवेचे । देठ मोहाचे काढिले ।।२।।
विवेकाचा चुना घोळला । कुमती सुपारी फोडिली ।
निश्‍चयाचा वेलदोडा । ऐसा अर्पियेला विडा।।२।।
जैसा कैसा विडा झाला । तैसा स्विकारावा नाथा ।।
करोनिया मुखशुद्धी । व्हावे संतुष्ट देवा ।।४।।