Lyrics of Ved Alikade Rahila from album Pipasa 2

वेद अलीकडे राहिला
वेद अलीकडे राहिला ।
पिपा पलीकडे उमटला ॥ धृ ॥
वेद नेती म्हणूनी मौन। पिपा नमने जाणी खूण
सर्व सारांचे नवनीत । तेचि पिपाचे उच्छिष्ट ॥
नाम अनिरुध्द घ्यावे । प्रेमे सेवे शरणी जावे
भक्तिधेनूचे दोहन । केले पिपेचि परिपूर्ण ॥
पिपा अभंग उच्चार। हेचि योगिंद्रा माहेर ॥ ३ ॥