Lyrics of Vaman Batuka from album Bol Bol Vaache

13. वामन बटुक कासव झाले
वामन बटुक कासव झाले ।
बाभळीच्या काट्यांना फळ गे लागले ॥धृ॥
बाईला सोडून बाप गे गरभार।
त्याच्या गे हातात ढाल तलवार ।
तलवारीची धार छत्तीस गुणांची ।
ढालीची पाठ उसव झुंबराची ॥१॥
ढाल गे घालतो सोताच्या डोईत।
तलवार झाकतो बाभळीच्या काट्यात।
काटे गं घालतो बाळाच्या भातात।
भात गे वाढतो बटुच्या झोळीत॥२॥
वामनाच्या झोळीमागे अकरावा चोर।
अनिरुद्धाच्या गोफणीने राखला गं पोर ॥३॥