Lyrics of Vaatchuklya Jeevani from album Pipasa 3

वाटचुकल्या जीवनी
वाटचुकल्या जीवनी तू धृवतारा।
भक्तिवेड्या पामरांना तारणारा॥
बाभुळवनीच्या पायवाटी गालिचा तू मखमली।
रणरणत्या वाळवंटी गरुडपंख सावली।
असा कसा तूच एक धावणारा॥
पदोपदी पडती प्रश्न, उत्तर ना हाती येत।
गोंधळूनी जाता मन, स्मरण होई तुझे थेट।
स्मरताची उपायांना धाडणारा॥
भजनाच्या रसरंगी नाचसी आनंदे।
भक्ताश्रु पाहताच मन तुझे आक्रंदे।
हळव्या जिवलगांना भावणारा॥
तूच एक अनिरुद्ध, मनुजा ना दोष देत।
दलदलीत फसलेल्या जीवांसी हात देत।
चुकलेल्या भक्तीलाही मानणारा॥
इतुक्यांचे प्रेम तुजवर, भरतीवर भरती।
श्रेष्ठ-दीन भाव नसे, तुझी दिगंत किर्ति।
पिसाचीही शब्दबोरे चाखणारा॥