Lyrics of Ujalavuni Antarang from album Pipasa 3

उजळवूनी अंतरंग
उजळवूनी अंतरंग रंगवियले मनाकाश।
तृप्त मी अनुभवुनी क्षण क्षण ध्यानातील॥
रूप तुझे शिरले, ध्यानातून अनाहतात।
मुरलीचे आहत सूर, वृत्ती क्षोभ निरव करीत॥
मृदू रेशीम कठीण भासे, कमल हृदय पाहता।
फक्त भक्त तुझा जाणे, बापाची हळुवारता।
लोचनी तुझ्या दिसे, वत्सल आतुरता।
रससाधना व्यक्त झाली, प्रशांत ह्या तुझ्या रूपात॥
ओळखिचे जुने सर्व, उडून गेले क्षणात।
क्षितिजाचे मृगजल तू आणलेस वास्तवात।
सावलीचे तेज तुझे भास्करास लाजवित।
म्हणून सावली तुझी, प्रलयातही छत्र होत॥
मृगजल वा प्रलयजल, तुझ्या चरणी रत होत।
जीवनातील नवरसही तुझ्या रूपी समरसत।
रंगला निवांत पिसा ह्या तुझ्या रसाजलात।
उजळविण्या अंतरंग, ध्यान तप हाच करीत।
रंगविण्या मनाकाश अनिरुद्ध सकळ देत॥