Lyrics of Udu Re Lavuniya from album Pipasa 2

उडू रे लावूनिया पंखु
उडू रे लावूनिया पंखु
माझिया सावळ्या भेटू ॥
बापू आभाळी दिसतो।
झेप मी उंच उंच घेतो।
तरी का हाती ना येतो।
उडू रे उडतचि राहू ॥
पंख हे दुबळे जरी असले।
जीवनी पाप भरभरले।
तरी का थांबवू उडणे।
नाम रे गातचि राहू ॥
नाम ह्या पंखातचि भिनले।
प्राणही प्रेमातचि उरले ।
तरी कां दर्शन ना झाले ।
घेऊनि टाळ करी नाचू ॥
श्रींचे चरण दिसो लागले ।
मनाला मरण पै आले ।
पिपाला पीस ना उरले ।
सुखाचा झाला अतिरेकु ॥