Lyrics of Ubha Bhoomivari from album Pipasa5

उभा भूमीवरी जरी
उभा भूमीवरी जरी। हात पोचती ब्रह्मांडी ॥१॥
ऐसी नाही कुठली जागा। जेथे ह्याचा वास नाही ॥२॥
ग्रंथ वाचूनि भारंभार। वेडे झाले ज्ञानी नर ॥३॥
मंत्रगजर करिता नित्य। ज्ञान मागे धावे सत्य ॥४॥
नाम अनिरुद्धाचे घेई। त्यासी कमी नाही काही ॥५॥
प्रेम अनिरुद्धासी करी। त्यासी कधी ना लाचारी ॥६॥
सहस्रहस्त सहस्रपाद। जेव्हा घेत असे मिठीत ॥७॥
जेवढा असे भक्त। हा तेवढाचि होत ॥८॥
पिसाला कचरा ब्रह्मांड। आपुला आनंद अनिरुद्ध ॥९॥