Lyrics of Tuze Naam God Kiti from album Ailatiri Pailatiri

5. तुझे नाम गोड किती
तुझे नाम गोड किती तुझे गुण गाऊ किती
पाहता पाहता तू उद्धरी जगासी ॥
तुझी गोमटी पाऊले तुझे सावळेचि रुप।
पाहता पाहता तू उद्धरी जगासी ॥
चातकाला जैसा घन तैसा मला घननीळ
पाहता पाहता तू भेदिसी मनासी ॥
कल्पनेच्या नानाऽपरी नेती तुझ्यापासूनी दूरी।
पाहता पाहता तू जाळिसी पापांसी ॥
वेगी लक्ष देऊनिया धाविसी वेळोवेळी।
पाहता पाहता तू रक्षिसी भक्तांसी॥