Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Tujhyasathi Bapu from album Pipasa 1

Lyrics of Tujhyasathi Bapu from album Pipasa 1

४. तुझ्यासाठी बापू करीतो प्रयास



तुझ्यासाठी बापू करीतो प्रयास॥
सोडिली मी लाज सर्वस्वाची ॥ १ ॥

सुदाम्याचे पोहे तुळशीचे पान ॥
ह्याच्यापुढे माझा पाड काय॥ २॥

चिखलाचे हात फूल कैसे वाहू ॥
टाळी वाजवीन तुझ्या नाम ॥ ३॥

अशुध्द ही वाणी नाम कैसे घेऊ ॥
चाखेन धुळी तुझिया पायी ॥ ४॥

कासावीस झालो पाठी धावताना ॥
जाळूनि मजला शुध्द करी ॥ ५ ॥

पिपा म्हणे मागे पाहता उमगलो ॥
बापू धावे माझ्या पाठी पाठी ॥ ६ ॥