Lyrics of Tu Dayecha from album Bol Bol Vaache

6. तू दयेचा अपार सागर
तू दयेचा अपार सागर । तू करुणेचे भावसरोवर ।
तुझिया चरणी नित्य नमितो । वंदन तुज अनिरुद्धा ॥धृ॥
सकल जगाला उद्धरण्याला अवनीवर प्रगटला ।
गुरुकृपेच्या तव प्रसादे मायपाश तोडिला ॥१॥
तू पक्ष्यात, तू प्राण्यांत, सर्वांच्या हृदयात।
चेतन तूचि, अचेतन तूचि, तू अवघ्या विश्वात॥२॥
कधी श्रीराम होऊनी त्वा दुष्टां संहारिले ।
गोकुळातील तव लीलांनी गोपींचे मन हरले ॥३॥
कंस वधाचा नायक होसी। पार्थसखा अन् तारक होसी।
श्रीकृष्ण तू योगेश्वर तू नीतिज्ञान शिकविसी॥४॥
या जगाचा तूच नियंता आधारवड झालासी।
सर्वस्पर्शी परब्रह्म तू अनिरुद्ध झालासी॥५॥